जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

नाशिक प्रतिनिधी- नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अध्यक्षांबद्दल अपशब्द वापर

कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा
मराठा आरक्षणासाठी ‘क्युरेटिव्ह याचिका’
बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी एकास 20 वर्षाची सक्त मजूरी

नाशिक प्रतिनिधी– नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अध्यक्षांबद्दल अपशब्द वापरल्याने अधिवेशन संपेपर्यंत अध्यक्षांनी जयंत पाटील यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले. यावर आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जयंत पाटील यांच्या निलंबनाच्या कृतीविरोधात ‘निर्लज्ज सरकारचा, निर्लज्जपणा’ असे म्हणत आंदोलकांनी सरकारचा निषेध केला. विरोधी पक्ष अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडत होते. मात्र असे असताना देखील सरकारने जयंत पाटील यांचे निलंबन केले हे निषेधार्ह असून, जयंत पाटील यांचे निलंबन सरकारने तातडीने मागे घ्यावे अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केलीय.

COMMENTS