नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. परमबीर सिंग फरार नसून त्यांच्या जिवाला धोका
नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे. परमबीर सिंग फरार नसून त्यांच्या जिवाला धोका असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिलेय. सर्वोच्च न्यायालयात आज, सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान परमबीर सिंग यांच्या वकिलानांनी सांगितले की, परमबीर सिंग यांची फरार होण्याची अथवा पळून जाण्याची त्यांची इच्छा नाही पण सध्या त्यांच्या जिवाला धोका आहे. महाराष्ट्रात आल्यास त्यांना मुंबई पोलिसांकडूनच धोका उद् भवू शकतो. खंडणीप्रकरणी परमबीर यांच्याविरोधात 4 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. परमबीर यांच्या याचिकेवर सुनावणी घेताना न्या. एस. के.कौल आणि न्या. एम.एम.सुंद्रेश यांच्या खंडपीठाने पोलिस महासंचालक संजय पांडे आणि केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) देखील नोटीस बजावली. याप्रकरणी गुरूवारी पार पडलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने परमबीरसिंग हे कोठे आहेत ? अशी विचारणा त्यांच्या वकिलाला केली होती.
COMMENTS