Homeताज्या बातम्यासंपादकीय

समृध्द ‘ महाराष्ट्राचे निर्माणकर्ते!

आजच्या अभियंता दिनानिमित्त त्यांना सॅल्युट!

असं म्हणतात की विकास हा चालत यावा लागतो; आणि चालत येण्यासाठी रस्ते आवश्यक असतात. केवळ रस्ते असून वेगाने चालता येत नाही, तर, त्यासाठी प्रशस्त रस्

बंडाच्या स्वल्पविरामाला अंकूर फुटेल?
पक्वानांच्या ताटात पालीची लघुशंका!
अबला महिला की पुरूष?

असं म्हणतात की विकास हा चालत यावा लागतो; आणि चालत येण्यासाठी रस्ते आवश्यक असतात. केवळ रस्ते असून वेगाने चालता येत नाही, तर, त्यासाठी प्रशस्त रस्ते असावे लागतात. ज्यातून तो प्रदेश, ते राज्य, तो देश अधिक समृद्ध होतो. महाराष्ट्र राज्य हे आज देशातील अतिशय विकसित असं राज्य गणलं जातं. हे समृद्ध राज्य आकारण्यात प्रत्यक्ष निर्माण कार्यात ज्यांचा सिंहाचा वाटा असं म्हणता येईल, ते म्हणजे रस्ते उभारणीकार अभियंते, या सगळ्यांनाच याचे विशेष श्रेय जाते. महाराष्ट्र हे राज्य विकसित होण्यात प्रभावी, वेगवान, प्रशस्त आणि सुरक्षित महामार्ग महत्वपूर्ण ठरले. देशात सर्वाधिक गुंतवणूकीचा ओघ या महाराष्ट्रात आणण्यात राज्यकर्त्यांचा दृष्टीकोन जितका महत्त्वाचा तितकाच त्या दृष्टीकोनाला प्रत्यक्षात साकारणाऱ्यांचे बौध्दिक आणि कृतीशील श्रमही महत्वाचे. राज्यात रस्ते, महामार्ग, एक्स्प्रेस वे, फ्री वे या बरोबरच मुंबई ते नागपूर हे वीस तासांचे अंतर अवघ्या सहा ते सात तासांवर आणून ठेवणारा समृध्दी मार्ग, मुंबई – पुणे एक्स्प्रेस वे, मुंबईतला फ्री वे या सगळ्यांची प्रत्यक्षात उभारणी करणारे अभियंते यांना तर आज अभियंता दिनानिमित्त महाराष्ट्राने सॅल्युट करायला हवा, एवढे त्यांचे कार्य महान आहे. महाराष्ट्राचे महामार्ग उभारणीत ज्यांना सॅल्युट करावं अशी नावांची जंत्री घेतली तर ती खूप मोठी होईल. परंतु, एवढी सगळी नावं आपण घेऊ शकत नसलो तरी काही नावे ही अशी असतात की, त्या नावांचा उच्चार केल्याशिवाय पुढे जाणे म्हणजे कृतघ्नपणा ठरेल. त्यामुळे ही नावे श्रेयनामावलीत असावीत. त्यातील राधेश्याम मोपलवार(Radheshyam Mopalwar) हे सनदी अधिकारी म्हणजे निवृत्त आय‌एएस अधिकारी. परंतु, २०१८ पासून निवृत्त होऊनही त्यांना महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती देऊन त्यांचा ज्ञान, अनुभव आणि सेवेचा महाराष्ट्राला फायदा करून दिला. राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना नुकतेच राज्याच्या पायाभूत सुविधा निर्माण च्या वार रूम चे महासंचालक नियुक्त करण्यात आले आहे. सध्या, मोपलवार ५५,००० कोटी रुपयांच्या नागपूर-मुंबई सुपरएक्सप्रेसवे, वरसोवा-वांद्रे सी लिंक, ७,००० कोटी रुपयांच्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मिसिंग लिंक आणि ८०० कोटी रुपयांच्या ठाणे खाडीचे प्रकल्प पाहत आहेत. यात आता दुसरे नाव मनोज सौनिक यांचे घ्यावे लागते. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव असणारे मनोज सौनिक हे वित्त विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांची सांगड घालणारे तज्ज्ञ आहेत. या यादीत तिसरे नाव अनिलकुमार गायकवाड यांचे घ्यावे लागेल. तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न असणारा समृध्दी महामार्गाचे नियोजन यांनीच केले. महाराष्ट्र शासनाचा दोन वेळा उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित अनिलकुमार गायकवाड यांची महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) सचिव (काम) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उड्डाणपूल, वैतरणा नदीवरील सर्वात उंच पूल, दिल्लीतील सुंदर महाराष्ट्र सदन आणि सध्या सुरू असलेला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, समृद्धी महामार्ग, एक्स्प्रेस वे आदींचे श्रेय हे अनिलकुमार गायकवाड यांचे आहे. याबरोबरच ड्रेनेज आणि मेन्टेनन्स चे कार्य नवघरे आणि साळूंखे यांनी भरीव पध्दतीने केले आहे. याबरोबरच ब. न. गोसावी, राजभोज, आर. आर. हांडे, चंद्रकांत नाईक, सुभाष माने, संजय इंदूरकर, मैथिली झुंजुर्णे, अनिल ढेपे, आर. वाय. पाटील, ब. पा. बहिर, अतुल चव्हाण, बढे, जे. डी. कुलकर्णी, विकास रामगुडे, धात्रक, पाटसकर, विलास कांबळे, अनिता परदेशी, सुषमा गायकवाड, गोसावी, नांदेडचे धोडगे, आदी अभियंत्यांचे महाराष्ट्राने खरे तर कौतुक करायला हवे. ते कौतुक यासाठी की, महामार्ग निर्माण करताना या अभियंत्यांना अनेक दिव्यातून जावे लागते. ज्यात रस्त्यांचा सखोल अभ्यास करण्यापासून या विषयातील तांत्रिक बाबी ज्या बांधकामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात;  विविध प्रकारचे रस्ते, बोगदे आणि पूल यांचे नियोजन, विकास आणि देखभाल करणे, महामार्ग नियोजन, स्थान आणि विस्तार भूमी निश्चित करणे, महामार्ग बांधण्यासाठी लागणारे साहित्याचा दर्जा निश्चित करणे, महामार्गावरील रहदारीचे कार्यप्रदर्शन आणि त्याचे नियमन आणि रस्त्यावरील ड्रेनेज इ. शिवाय, पूल, बोगदे, महामार्ग बांधणीसाठी महामार्ग नियोजन ही देखील मूलभूत गरज आहे. महामार्ग अभियंते महामार्ग प्रणालीच्या सर्व संभाव्य नागरी परिणामांचा अंदाज लावण्यासाठी आणि त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. त्यामुळे, आजच्या अभियंता दिनानिमित्त त्यांना सॅल्युट!

COMMENTS