Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्नल पुरोहितांच्या पुस्तक प्रकाशनाला पुरोगामी संघटनांचा विरोध

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात कोबाद गांधी यांच्या ’फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या अनुवादित पुस्तकाला पुरस्कार वापस घेण्यावरून वाद सुरू असताना आता पुण्यात एका प

विवेकी उपक्रमशीलता नव्या उपक्रमाला जन्म देते ः प्राचार्य शेळके
मनसेे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी
सामाजिक सलोखा राखण्यासाठी आरोपींवर कारवाई करा ः संधान

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात कोबाद गांधी यांच्या ’फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या अनुवादित पुस्तकाला पुरस्कार वापस घेण्यावरून वाद सुरू असताना आता पुण्यात एका पुस्तक प्रकाशनावरून वाद सुरू झाला आहे. मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी असलेले लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर लेखिका स्मिता मिश्रा यांनी लेफ्ट. कर्नल पुरोहित द मॅन बेट्रेड? या पुस्तक लिहिले असून या पुस्तकाचे प्रकाशन आज 18 डिसेंबर रोजी पुण्यातील स. प. महाविद्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. मात्र, या पुस्तक प्रकाशनावरून आता वाद सुरू झाला आहे. या प्रकाशनाला पुरोगामी विचारांच्या संघटनांनी विरोध दर्शवला आहे. भीमआर्मी बहुजन एकता मिशन अध्यक्ष दत्ता पोळ आणि मूलनिवासी मुस्लिम मंच अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी स. पा. महाविद्यालयाचे प्राचार्य यांना भेटून हा कार्यक्रम महाविद्यालयात घेऊ नये अशी मागणी केली आहे. लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित हे मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी आहेत. त्यांची मुक्तता झाली असली तरी ते आरोप मुक्त झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर लिहिलेल्या या पुस्तकावर आक्षेप घेतला जात आहे.

COMMENTS