नाशिक प्रतिनिधी - पिंचाक सिलॅट असोसिएशन ऑफ नाशिक आयोजित पाचव्या जिल्हा स्तरीय पिंचाक सिलॅट या इंडोनेशियन मार्शल आर्ट प्रकारात प्रोग्रेसिव्ह इंग
नाशिक प्रतिनिधी – पिंचाक सिलॅट असोसिएशन ऑफ नाशिक आयोजित पाचव्या जिल्हा स्तरीय पिंचाक सिलॅट या इंडोनेशियन मार्शल आर्ट प्रकारात प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल जाधव संकुल मधील विद्यार्थ्यांनी पंधरा गोल्ड व सहा सिल्वर मेडल पटकावून संघाने जिल्हा पातळीवर पहिला मान मिळवला
यामध्ये जीत गिरी तीन गोल्ड, अमित विश्वकर्मा तीन गोल्ड , साहील केदारे तीन गोल्ड ,अंकुश वर्मा दोन गोल्ड सोहम नेरकर दोन गोल्ड ,सिदार्थ सिंह एक गोल्ड, एक सिल्वर ,आयन खान एक गोल्ड ,कौसर खान एक गोल्ड, गुडिया राय एक गोल्ड, संचिता राय एक गोल्ड,आकाश पासवान एक गोल्ड हनि सिंह सिल्वर शालिनि गिरी एक सिल्वर , प्रिया सिंह सिल्वर , सच्ची सिंह एक सिल्वर,तेजस कासोदे एक सिल्वर या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक व रोप्य पदक मिळवून राज्यास्तरासाठी त्यांची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून मा. नगरसेवक भागवत भाऊ आरोटे तसेच प्रेसिडेंट ऑफ इंडियन पिंचाक सिलॅट असोसिएशनचे किशोर येवले आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा ही खेळाचे सर्व नियम पाळून योग्य पद्धतीने पार पडल्या यासाठी सर्वात जास्त पदके पटकवून हा संघ पहिल्या क्रमांकावर आला तसेच संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सचिव ज्योती कोल्हे ,समन्वयिका सुरेखा आवारे , मुख्याध्यापिका उमादेवी विश्वकर्मा यांनी विद्यार्थ्यांना कौतुकास्पद शुभेच्छा दिल्या. यासाठी विद्यार्थ्यांना खेळ प्रशिक्षक योगेश पानपाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून या यशासाठी सहकार्य केले. तसेच सर्व शालेय शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.भविष्यातही विद्यार्थ्यांच्या यशासाठी व विश्वगुरू व सशक्त भारत बनवण्यासाठी संस्था व शाळा प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.
COMMENTS