Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वनश्री महाडीक मल्टीस्टेट सोसायटीला 56 लाखांचा नफा : राहुल महाडीक

इस्लामपूर / प्रतिनिधी : वनश्री नानासाहेब महाडीक मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी या आर्थिक वर्षात एकूण नफा 56 लाख 53 हजार 612 रुपये इतका नफा झाला. अशी

हेळवाक येथे घरात घुसलेला बिबट्या जेरबंद
मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोर्टाचा पुन्हा धक्का; गुन्ह्यातून वगळण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली
संभुआप्पा-बुवाफन यात्रेतील बाजार शाळा नंबर 1 समोरील मैदानावर भरणार : विक्रमभाऊ पाटील यांची माहिती

इस्लामपूर / प्रतिनिधी : वनश्री नानासाहेब महाडीक मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी या आर्थिक वर्षात एकूण नफा 56 लाख 53 हजार 612 रुपये इतका नफा झाला. अशी माहिती संस्थेचे संस्थापक राहुल महाडीक यांनी दिली.
महाडीक म्हणाले नानासाहेब महाडीक यांच्या नावाने सुरू असलेल्या संस्थेने संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार व कर्मचारी विश्‍वासावर चालणारी ही आदर्श संस्था म्हणून ओळख मिळवली आहे. संस्थेचे भागभांडवल 6 कोटी 56 लाख आहे. एकूण ठेवी 75 कोटी 26 लाख असून गुंतवणूक 32 कोटी 63 लाख आहे.
या संस्थेने एकूण कर्जे वाटपासह योग्य व्यवस्थापनातून शून्य टक्के एनपीए राखण्यात यश मिळवले आहे. सभासद व ठेवीदारांनी संस्थेवर विश्‍वास दाखवल्याने मंदीच्या काळात देखील ठेवींमध्ये वाढ झाली आहे. तसेच संस्थेने आर्थिक वर्षात अनेक सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांसाठी विविध स्पर्धांचे खेळांचे आयोजन शेतकर्‍यांची पद सुधारावे यासाठी विविध कृषी पूरक योजनेच्या माध्यमातून कर्जपुरवठा तरुणांना व्यवसायासाठी आर्थिक हातभार अशा माध्यमातून समाजाचे हित जोपासले आहे. संस्थेचे सर्व शाखा संगणीकृत असून सभासदांना नेट बँकिंग चा फायदा करून घेता येतो. आरटीजीएस, एनएफटी, लाईट बिल, फोन बिल सर्व विमा कंपनी हफ्ते, इतर बँकातील आर्थिक व्यवहार करण्याची सुविधा संस्थेने उपलब्ध करून दिल्या आहेत.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश महाडीक, उपाध्यक्ष रवींद्र आडमुठे, संचालक कपिल ओसवाल, संचालक अमोल पडळकर, संचालक इसाक वलांडकर, तुकाराम खटावकर, संस्थेचे कार्यकारी संचालक आर. एम. बागडी यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

COMMENTS