Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा. राम शिंदे यांच्यावर बोलण्या अगोदर दहा वेळा आरसा पहावा

भाजपचे पप्पूशेठ धोदाड यांची आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका

कर्जत/प्रतिनिधी - ज्यांच्या राजकारणाची सुरुवातच खोटेपणातून झाली आहे, त्यांनी प्रा. राम शिंदे यांच्यावर बोलण्याअगोदर दहा वेळा आरसा पहावा आणि मग इत

निकालाने ते खालच्या पायरीवर आले ः आ.प्रा. राम शिंदे
डॉ. भास्कर मोरेला अटक करण्याची पोलिसांनी कृती करावी
सीनाचे आवर्तन सोडण्याचे आ. राम शिंदे यांचे आदेश

कर्जत/प्रतिनिधी – ज्यांच्या राजकारणाची सुरुवातच खोटेपणातून झाली आहे, त्यांनी प्रा. राम शिंदे यांच्यावर बोलण्याअगोदर दहा वेळा आरसा पहावा आणि मग इतरांना खोटे म्हणण्याचे धाडस करावे. आ. रोहित पवार यांनी एका न्यूज चॅनेलवर मुलाखत देताना प्रा. राम शिंदे यांना खोटे संबोधित केलेल्या टीकेला उत्तर देताना भाजपचे तालुका समन्वयक पप्पूशेठ धोदाड यांनी पत्रकाद्वारे आ. पवार यांच्यावर सडकून टीका केली.


पुढे ते म्हणाले, काही लोकांचा असा गोड गैरसमज असतो की उपदेश आणि सल्ला हा फक्त इतरांना देण्याकरता आणि इतरांनी आचरणात आणण्याकरताच असतात. विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या काळातील आपली भाषणे, वचने आठवावी. प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येक तलावात कुकडीच्या पाण्यासाठी मोजमाप करणार्‍या टीम कुठे आहेत? उलट्या चार्‍यांची आखणी करणार्‍या टीम कुठे आहेत? खोटेपणातूनच आपल्या राजकीय कारकीर्दची सुरुवात करणार्‍या आमदार महोदयांनी खोटेपणाचे शिंतोडे दुसर्‍यावर उडवण्याअगोदर आत्मपरीक्षण करावे. नव तरुणांना नोकरी आणि छोकरीचे आमिष कोणी दाखवले? मोफत किंवा अनुदानितच्या नावाखाली किती लोकांना पीठ गिरणी मिळाल्या? किती लोकांना विनामूल्य लायसन्स मिळाले? किती मुलांची लग्न लावून दिली? किती वर्षे टँकरने पाणीपुरवठा केला? या सर्व खोट्या आश्‍वासित प्रश्‍नांची उत्तरे अजून प्रलंबितच आहेत, असेही धोदाड यांनी म्हटले आहे. दुसरीकडे याच खोटेपणातून किती नोकरदारांना आपल्या जाचामुळे त्रास सहन करावा लागला. किती व्यावसायिकांना दबावापोटी पक्षप्रवेश करावा लागला? किती गावांचे गायरान गावकर्‍यांच्या ताब्यातून गेले? नगरपंचायत निवडणुकीत किती खालच्या पातळीवर जाऊन सत्ता मिळवली? किती उमेदवार पळवले? हे संबंध महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आरशात पाहून रोहित पवार यांनी प्रा. शिंदे यांच्याबाबतीत वक्तव्य करावे, असे धोदाड म्हटले.

COMMENTS