Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा. कुंदा दाभोळकर स्मृति केंद्रातर्फे लक्ष्मीबाई पाटील वस्तीगृहाला सहयोग निधी आज प्रदान कार्यक्रम

सातारा / प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई पाटील विद्यार्थिनी वस्तीग्रह साठी सहयोग म्हणून प्रा. कुंदा (अंबू) दाभोळकर स्मृती केंद्रातर्फे य

माजी मंत्री शिवाजीराव नाईक स्वगृही; हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत दाखल; भाजपला मोठा धक्का
मार्चअखेर कोल्हापूर शहराला मिळणार पाईपलाईनद्वारे स्वयंपाकाचा गॅस
महावितरणच्या प्रादेशिक नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाचे ‘सवाल अंधाराचा’ सर्वोत्कृष्ट; कोल्हापूर परिमंडलाचे ‘इस्किलार’ द्वितीय

सातारा / प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई पाटील विद्यार्थिनी वस्तीग्रह साठी सहयोग म्हणून प्रा. कुंदा (अंबू) दाभोळकर स्मृती केंद्रातर्फे यावर्षीचा एक लाख रुपयांचा धनादेश समता दाभोळकर यांच्या हस्ते सोमवार, दि. 15 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता लक्ष्मीबाई पाटील विद्यार्थिनी वस्तीगृहात संस्थेकडे प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. प्रसन्न दाभोळकर यांनी दिली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई पाटील विद्यार्थिनी वस्तीगृहात आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या घरातील मुली आणि वंचित समाजातील मुली राहतात व शिक्षण घेतात. या वस्तीगृहाला शासकीय अनुदान मिळत नाही. या वस्तीगृहाच्या दैनंदिन कामात सहयोग म्हणून प्रा कुंदा (अंबू) दाभोलकर स्मृति केंद्रातर्फे रयत शिक्षण संस्थेकडे एक रकमी ठेवण्यात आली आहे. त्यातील व्याजातून दरवर्षी सहयोग म्हणून या वस्तीगृहाला सुमारे एक लाख रुपये दिले जातील, अशी रचना आहे.
मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत धनादेश प्रदान करण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर वस्तीग्रहातील मुलींचे कविता वाचन, त्यांच्याशी गप्पाटप्पा आणि संध्याकाळी पावणेसात वाजता मुलींच्या बरोबर स्नेहभोजन असा कार्यक्रम आहे. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

COMMENTS