टिटवाळा परिसरातील बाधित चाळकऱ्यांना मोबदला देण्याची कार्यवाही सुरू : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टिटवाळा परिसरातील बाधित चाळकऱ्यांना मोबदला देण्याची कार्यवाही सुरू : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई, दि. 24 : पुणे-बडोदा महामार्गाकरिता टिटवाळा परिसरातील बाधित चाळकऱ्यांना मोबदला देण्याची कार्यवाही सुरू आहे चाळधारकांना गुणवत्तेनुसार पडताळणी कर

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्काराकरीता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
मणिपूरमधील उद्रेक
पीएसआय झालेल्या अजय कळसकर यांचा सन्मान

मुंबई, दि. 24 : पुणे-बडोदा महामार्गाकरिता टिटवाळा परिसरातील बाधित चाळकऱ्यांना मोबदला देण्याची कार्यवाही सुरू आहे चाळधारकांना गुणवत्तेनुसार पडताळणी करून घराचा मोबदला देण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत केली. विधानपरिषद सदस्य रविंद्र फाटक यांनी ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरातील दोन हजार चाळी पुणे-बडोदा महामार्गात बाधित होत असून चाळकऱ्यांनी आपली घरे प्रकल्पासाठी देण्यास सहमती दिली आहे प्रकल्पबाधित चाळकऱ्यांना मिळणारा मोबदला जागामालक हिरावून घेत आहेत याबाबत शासनाने केलेल्या कार्यवाहीसंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, पुणे-बडोदा महामार्गाच्या भूसंपादन प्रकरणी उपविभागीय अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कल्याण यांच्याकडे मुल्यांकन प्राप्त झालेले आहे.या बांधकामाचा मोबदला देण्यापूर्वी संबंधित जागामालक, बांधकाम करणारे बांधकाम विकासक आणि चाळीतील घर विकत घेणारे यांचे ना हरकत दाखले व हमीपत्र घेवून कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच चाळधारकांना पडताळणी करून घराचा मोबदला देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सादर केली.

COMMENTS