नगरच्या निवडणूक विजयाची डीजे मिरवणूक चर्चा मुंबईत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या निवडणूक विजयाची डीजे मिरवणूक चर्चा मुंबईत

शिवराष्ट्र सेनेचे आझाद मैदानावर आंदोलन

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरमध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर डीजे लावून काढलेल्या मिरवणुकीची चर्चा थेट मुंबईत पोहोचली आहे. डीजे लावून काढलेल्या या म

छत्रपती प्रतिष्ठानच्या पारितोषिकांचे 9 एप्रिलला वितरण
jalgaon : कळसुबाई शिखर सर केल्याबद्दल श्रीमद यांचा सत्कार l LokNews24
नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता यास सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरमध्ये झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर डीजे लावून काढलेल्या मिरवणुकीची चर्चा थेट मुंबईत पोहोचली आहे. डीजे लावून काढलेल्या या मिरवणुकीने जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केला असल्याने ही मिरवणूक काढणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नगरच्या शिवराष्ट्र सेनेच्या पदाधिकार्‍यांनी केली असून, यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे त्या मिरवणुकीची व या आंदोलनाची चर्चा मुंबईतही सुरू झाली आहे.
शिवराष्ट्र सेनेचे मुंबईतीस आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू असून, नगर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला धुडकावून वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्थेच्या निवडून आलेल्या उमेदवारांनी बेकायदेशीर जमाव जमून डीजे सिस्टीम लावून मिरवणूक काढून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. डीजे लावून जल्लोष करणार्‍या विजयी उमेदवारांवर व डीजे मालकावर गुन्हे दाखल करण्याची मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली. याबाबतची माहिती अशी की, येथील वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित, अहमदनगर यांच्या व्यवस्थापक समितीची पंचवार्षिक निवडणूक होऊन विजयी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीर जमाव जमून डीजे साऊंड सिस्टिम लावून अधीक्षक अभियंता महावितरण या सरकारी कार्यालयाच्या आवारात जल्लोष केला तसेच कर्मचारी व विजयी उमेदवारांनी यातून आदेशाचे उल्लंघन केले असून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवराष्ट्र सेनेच्यावतीने मुंबई येथील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यात शिवराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, सह्याद्री छावा संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर विसे, अखिल भारतीय छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखाताई सांगळे, अविनाश नवगिरे आदी सहभागी झाले आहेत.

अधीक्षक अभियंता कारवाई मागणी
निवडून आलेले कर्मचारी सचिन चोरगे, कैलास अभंग, अशोक पाथरकर, श्रीराम वाकचौरे, बाबासाहेब वाकडे, एकनाथ शिंदे, अर्जुन झनान, शंकर जारडकर, गजानन हुलगुंडे, सतीश चोळके, संजय घाडगे यांनी व कर्मचार्‍यांनी बेकायदेशीररित्या एकत्र जमून डीजे सिस्टीम लावून कार्यालयाच्या आवारातच मिरवणूक काढली असून याबाबत महावितरणचे नगरचे अधीक्षक अभियंता यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून कामगारांना पाठीशी घातले आहे. त्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी करून संबंधित कर्मचार्‍यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी व कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीचे निवेदन नगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिले असून अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मुंबईत धरणे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

तातडीने कारवाई व्हावी
डीजे मिरवणूक प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सेवा हमी व दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मुंबई येथे आझाद मैदान येथे शिवराष्ट्र सेनेच्यावतीने धरणे आंदोलन चालू करण्यात आले असून या आंदोलनाला छावा संघटनेचा पाठिंबा देण्यात आला आहे.

COMMENTS