Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमधील मृत्यूला खाजगी रुग्णालये जबाबदार ः मुश्रीफ

सलग सुट्टयांमुळे मुलांना सरकारी रुग्णालयात पाठवल्याचा आरोप

मुंबई/प्रतिनिधी ः नांदेड येथील शासकीय रूग्णालयामध्ये चार दिवसांत मृत्यूच्या संख्येचा आकडा अर्धशतकाने ओलांडला असून, याप्रकरणी खाजगी रुग्णालये जबाब

करणी सेनेचे संस्थापक लोकेंद्र सिंह कालवी यांचे निधन
बंधाऱ्याचे पाणी शेतीमध्ये, शेतातील माती नदीमध्ये
राज ठाकरेंचा पाठिंबा ‘मनसे’ का ?

मुंबई/प्रतिनिधी ः नांदेड येथील शासकीय रूग्णालयामध्ये चार दिवसांत मृत्यूच्या संख्येचा आकडा अर्धशतकाने ओलांडला असून, याप्रकरणी खाजगी रुग्णालये जबाबदार असल्याचा गंभीर आरोप वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. खासगी दवाखान्यात 5 दिवस सुट्ट्या असल्यामुळे या रुग्णालयांनी लहान मुलांना सरकारी रुग्णालयात शिफ्टी करायला लावले. या सर्व शिफ्टींगमुळे लहान मुलांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला आहे.
नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात चोवीस तासांत झालेल्या नवजात बाळांच्या मृत्यूप्रकरणी मुश्रीफ यांनी खासगी रुग्णालयांना जबाबदार धरले आहे. दरम्यान नांदेड मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. यावेळी झालेल्या चर्चेचा तपशील आता समोर आला आहे. या प्रकरणात चौकशी समिती नेमली असून काही महत्वाचे कठोर निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती देखील मुश्रीफ यांनी दिली आहे. सरकारी रुग्णालयातील स्वच्छता आणि डॅाक्टरांच्या बदल्यांबाबत सरकार निर्णय घेत असल्याची माहिती देखील मुश्रीफ यांनी दिली.

दरम्यान, नांदेडच्या अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यातील कुरुळा येथील मायलेकाच्या मृत्यू देखील झाला होता. या प्रकरणी त्यांच्या नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात रुग्णालय प्रशासनाविरोधात तक्रार दिल्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात अंजली वाघमारे (वय 22) या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. नैसर्गिक प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला होता. मात्र, रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे तिच्या नवजात मुलीचा मृत्यू झाला. दरम्यान, या महिलेची देखील प्रकृती बिघडल्याने तिचा देखल मृत्यू झाला. यामुळे रुग्णालय प्रशासनाने आणि डॉक्टरांनी त्यांना बाहेरून औषधे आणायला लावली होती. दरम्यान, या प्रकरणी कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामाजी टोम्पे यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी नुसार अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे व बालरोग विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार दिवसांत 50 जणांचे मृत्यू – नांदेडच्या विष्णुपुरी येथील डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्युचे सत्र थांबता थांबेना झाले आहे. मागील 24 तासांत आणखी 14 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे 4 दिवसांत मृत्यूचे अर्धशतक झाले आहे. त्यामुळे या मृत्यूंना जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा – डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 24 तासांत 31 रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दवाखान्याचे अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे व बालरोग विभागातील डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिष्ठाता डॉ. एस.आर. वाकोडे यांनी दवाखान्यात औषध पुरेशा प्रमाणात नसल्याचे देखील कारण दिले होते. नांदेडच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी 24 तासांत तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यात 12 लहान मुलांचा समावेश होता, या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरले होते. तसेच राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर देखील प्रश्‍न उपस्थित करण्यात आले होते.

COMMENTS