श्रीरामपूर ः शिक्षणक्षेत्र हे ज्ञान आणि प्रामाणिक सेवाशीलतेचे पुण्यस्थळ आहे. अहमदनगर येथीलं हिंद सेवा मंडळाचे पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राच

श्रीरामपूर ः शिक्षणक्षेत्र हे ज्ञान आणि प्रामाणिक सेवाशीलतेचे पुण्यस्थळ आहे. अहमदनगर येथीलं हिंद सेवा मंडळाचे पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांनी मराठी संशोधन विभागाला उपक्रमशीलतेच्या माध्यमातून गुणवत्ता प्राप्त करून दिली असल्याचे मत श्रीरामपूर येथील माजी मराठी विभागप्रमुख, मराठी ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे अहमदनगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयात मराठी संशोधन केंद्रातर्फे आयोजित पीएच.डी. कोर्सवर्कमध्ये ’कालखंडाचा आणि लेखकाचा अभ्यास’ या विषयाचे विवेचन करताना डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांनी स्वागत करून डॉ. उपाध्ये यांचा सन्मानचिन्ह, पेन, भेटवस्तू देऊन सन्मान केला. पीएच.डी. कोर्समध्ये सहभागी असलेले कविवर्य चंद्रकांत पालवे यांनी डॉ. उपाध्ये यांना ’मोहोर: उजेड वाटावर’ हा कवितासंग्रह भेट देऊन सन्मान केला. प्रा. सुनील धस यांनी नियोजन केले. कोर्सवर्कमधील दत्ताराम राठोड, सोनाली फुलशेटे, एकता कोरेगावकर, सुनील राजपूत, बडे महाराज, निर्मला आंधळे, सुप्रिया सासवडे, वंदना सोनवणे, शिल्पा जोशी आदिंनी कोर्सवर्कचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल डॉ. उपाध्ये लिखित’ साहित्यशोध’ ग्रंथ देऊन सर्वांचा संशोधन कार्याबद्दल सन्मान केला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कालखंड कसे मानले जातात ? आणि त्यातून वाङमयेतिहासाचे वेगळेपण कसे लक्षात घ्यावे याविषयी विवेचन करून मध्ययुगीन कालखंड, अर्वाचीन कालखंड यामधील राजकीय, सामाजिक, वाङमयीन संदर्भाने विवेचन केले. संशोधन विभागातील अभ्यासकांसाठी जिल्ह्यात उत्कृष्ट असे नियोजन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पीएच.डी. कोर्सवर्कमध्ये सहभागी अभ्यासकांनी संशोधनात्मक विविध अंगाने प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तीन तास चर्चा केली. विविध संदर्भमय व्यापकतेतून व्याख्यान संपन्न झाले.प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांनी महाविद्यालय गुणवत्ता आणि मराठी पीएच.डी. कोर्सवर्कचे प्रत्यक्ष आयोजन यामधील भूमिका स्पष्ट केली. श्री.दत्तात्रय राठोड यांनी आभार मानले.
COMMENTS