श्रीरामपूर : मानवी संस्कृती ही शिक्षण आणि सेवेतून आकाराला आली आहे. या वाटचालीचा अनुभवी आविष्कार असलेले प्राचार्य शंकरराव आत्माराम अनारसे यांचे’ श

श्रीरामपूर : मानवी संस्कृती ही शिक्षण आणि सेवेतून आकाराला आली आहे. या वाटचालीचा अनुभवी आविष्कार असलेले प्राचार्य शंकरराव आत्माराम अनारसे यांचे’ शब्दवैभव’ हे पुस्तक म्हणजे ज्ञानदीप लावू जगी हा आदर्श सांगणारे पुस्तक होय,असे मत ड, रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान कार्यकारिणी चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांनी व्यक्त केले.
येथील माऊली वृद्धाश्रम आणि जानकीमाऊली अनाथ वसतिगृहात माजी प्राचार्य शंकरराव अनारसे यांनी लिहिलेल्या’ शब्दवैभव’ पुस्तकावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य शेळके बोलत होते. प्रारंभी श्रीविठ्ठल रुक्मिणी मूर्तींचे पूजन करण्यात आले. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून’ शब्दवैभव’ पुस्तकाचे अंतरंग उलगडून सांगितले. यावेळी प्राचार्य डॉ शंकरराव गागरे, मुंबई येथील मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी श्रीकांत अनारसे, प्रा. शिवाजीराव बारगळ, कुंडलिक फापाळे, सौ. अलकाताई फापाळे, कु. समृद्धी कडलग, सुभाष वाघुंडे, सौ. कल्पनाताई वाघुंडे, शुभम नामेकर, संतोष भालेराव, राजेंद्र रासणे, बन्सीभाऊ शिंदे, रामेश्वर भोर, पांडुरंग जाधव, सतोबा राऊत, वृद्धाश्रमातील आजी -आजोबा, अनाथ वसतिगृहातील यश भले, प्रणव साळुंकेसह13 विद्यार्थी उपस्थित होते. माऊली वृद्धाश्रमाचे प्रमुख सुभाष वाघुंडे यांनी डॉ. संजय अनारसे यांचे आमच्या आश्रमावर उपचारात्मक अनंत ऋण असल्याचे सांगून अनारसे परिवार पुण्यशील असल्याचे सांगून आश्रमाची माहिती दिली. प्राचार्य अनारसे यांच्या 87 वर्षाच्या जीवन वाटचालीचा आढावा घेणारे आणि शिक्षणतपस्वी गुरु असणारे अनारसे म्हणजे आजच्या पिढीला आदर्श असल्याचे सांगत प्राचार्य शेळके यांनी विविध प्रसंगातून प्राचार्य अनारसे यांचे मोठेपण सांगितले. प्राचार्य गागरे, श्रीकांत अनारसे, प्रा. बारगळ , कुंडलिक फापाळे यांनी आपल्या मनोगतातून प्राचार्य अनारसे म्हणजे शैक्षणिक, कौटुंबिक, साहित्यिक आदर्श असल्याचे सांगून प्राचार्य अनारसे यांचा सत्कार केला प्राचार्य शेळके यांनी शब्दवैभव पुस्तकाचे वाचन प्रत्येकाने करावे असे सुचविले. प्राचार्य अनारसे यांनी आपल्या भाषणातून,’ माळावरची माती’ या आत्मचरित्रातील प्रसंग सांगून आपले जीवन कष्टातून कसे निर्माण झाले ते उदाहरणातून सांगितले. आपले87 वर्षाचे जीवन म्हणजे परमेश्वराने दिलेला आशीर्वाद असून मंत्रालयातील डायरेक्टर श्रीकांत अनारसे, निष्णात सर्जन डॉ. संजय अनारसे, कन्या बालरोगतज्ज्ञ. डॉ मंजुताई शेरकर ही तिन्ही अपत्ये आणि तितकीच हुशार नातवंडे आदर्श पत्नी सौ. कमल यांचे पाठबळ यामुळे जीवनात समाधान असल्याचे सांगितले. प्राचार्य अनारसे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर दादा पाटील यांच्या सहवासातील आठवणी सांगून डॉ. उपाध्ये यांच्यामुळे अनेक पुस्तके लिहिल्याचे अनुभव सांगितले. श्रीकांत अनारसे यांनी आपल्या वडिलांवर प्रभावी मनोगत व्यक्त केल्याबद्दल डॉ. उपाध्ये यांनी श्रीकांत अनारसे यांचा सत्कार केला. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे, माऊली वृद्धाश्रमातर्फे वाघुंडे परिवार, वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फ डॉ. उपाध्ये आदिंनी प्राचार्य अनारसे यांचा सत्कार केला. प्राचार्य अनारसे यांनी वृद्धाश्रमाच्या सेवाकार्यासाठी रोख देणगी देऊन ग्रंथालयासाठी पुस्तके दिली. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले तर कल्पनाताई वाघुंडे यांनी प्राचार्य अनारसे यांचे शब्दवैभव पुस्तक हे त्यांच्या बौद्धिक, कौटुंबिक विचारांचे वैभव असल्याचे सांगून आभार मानले.
COMMENTS