Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ?

शहाजी पाटील यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

मुंबई प्रतिनिधी - लोकसभा निवडणूक या किंवा पुढच्या आठवड्यात जाहीर होऊ शकते अशी परिस्थिती आहे. अशात भाजपाच्या प्रचारसभा सुरु झाल्या आहेत. महाराष

योगाला जीवनाचा अविभाज्य भाग बनवा
आदिवासीसाठी 24 हजार कोटींची तरतूद
वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला जाणार

मुंबई प्रतिनिधी – लोकसभा निवडणूक या किंवा पुढच्या आठवड्यात जाहीर होऊ शकते अशी परिस्थिती आहे. अशात भाजपाच्या प्रचारसभा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रात अमित शाह यांचा दौरा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील राज्यात येतील. या सगळ्या वातावरणात एक चर्चा रंगली आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे भाजपासह जातील का? याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे शिंदे गटाच्या आमदाराने केलेलं वक्तव्य. शिंदे गटाच्या आमदाराने एक हजार टक्के खात्रीने सांगितलं आहे की उद्धव ठाकरे भाजपासह जातील आणि लवकरच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. एक हजार टक्के उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र येणार हे आज तुम्हाला सांगतो. आपला अंदाज चुकणार नाही. दिवस कुठला ते बघावं लागेल. पण हे व्हावंच लागेल कारण हिंदुत्वाचा विचार त्यामागे आहे. हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवता येणार नाही. पंतप्रधान मोदींकडे उद्धव ठाकरेंना जावं लागण्याचा दिवस येणार आहे. लवकरच येणार आहे, राम मंदिर बांधल्यापासून एक वेगळं वातावरण आहे. अशा वातावरणात जर उद्धव ठाकरेंनाही वाटलं की आपणही भाजपासह जावं तर त्यात गैर काही नाही. महायुतीला लोकसभा निवडणुकीत ४५ जागा मिळतील असाही दावा शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत शहाजी बापू पाटील यांनी हा दावा केला आहे.

COMMENTS