Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान मोदी यांचा आज मुंबईत रोड शो

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईतील उमेदवारांचा प्रचार करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 मे आणि 17 मे रोजी मुंबई दौर्‍यावर येणार आहेत. यावेळी नरेंद्र म

शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या
तुमचे आजचे राशीचक्र मंगळवार, २२ जून २०२१ l पहा LokNews24
बदलती जीवनशैली आणि तणाव !

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईतील उमेदवारांचा प्रचार करण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 मे आणि 17 मे रोजी मुंबई दौर्‍यावर येणार आहेत. यावेळी नरेंद्र मोदी मोठ्या प्रमाणात शक्ति प्रदर्शन करत मुंबईत रोड शो करणार आहे. यापार्श्‍वभूमीवर मुंबईतील अनेक मार्ग बंद राहणार आहेत. याबाबत मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांनी माहिती दिली आहे.
नरेंद्र मोदी यांचा आज (15 मे) मुंबईत रोड शो असल्यामुळे आज दुपारी 2 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत मुंबईच्या एलबीएस मार्ग बंद राहणार आहे. तसेच माहुल घाटकोपर रोडवरील मेघराज जंक्शन ते आर. बी. कदम जंक्शनपर्यंत उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूला वाहतूक दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून संपूर्ण एलबीएस मार्ग व एलबीएस मार्गाला जोडणार्‍या मुख्य रस्त्यापासून 100 मीटर अंतरापर्यंत 14 आणि 15 तारखेला नो पार्किंग करण्यात आले आहे. मोदी त्यांच्या पहिल्या दौर्‍यात घाटकोपर ते मुलुंड असा रोड शो करणार आहेत. जिथे विद्यमान खा. मनोज कोटक यांना तिकिट नाकारून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. मिहिर कोटेचा यांची ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याशी कडवी लढत होणार आहे. बहुभाषिक असलेल्या ईशान्य मुंबईत पुर्नविकास, डोंगराळ झोपडपट्ट्या, आरोग्य असे अनेक मोठे प्रश्‍न असताना या विषयाला बगल देत, सध्या या मतदार संघात मराठी विरुध्द गुजराती तर कुठे हिंदू मुस्लिम असा वाद रंगल्याचे पहायला मिळत आहे. या मतदार संघात गोवंडी सारख्या विभागात मुस्लिम मतदार जास्त असल्याने तिथे हिंदू-मुस्लिम वादाला हवा दिली जात आहे. मात्र, या विभागातील जनता मात्र मूळ विषयांवर प्रकाश टाकताना दिसते. तसेच घाटकोपरमध्ये मराठी आणि गुजराती असे समसमान मतदार असल्याने इथे गुजराती विरुध्द मराठी वाद पाहायला मिळत आहे. मात्र, सामान्य नागरिकांना या वादावर पडदा पडावा अशी इच्छा आहे. त्यामुळे मूळ प्रश्‍नांना बगल देऊन धार्मिक आणि प्रांतीय तेड निर्माण करून मतांचे राजकारण करू पाहणार्‍यांना यावर विचार करणे गरजेचे आहे.
पुढील मार्गात तात्पुरता स्वरूपात बदल : अंधेरी घाटकोपर मार्गावरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन दरम्यान उत्तर व दक्षिण वाहिनीवरील वाहतूक. गोळीबार मैदान व घाटकोपर मेट्रो असताना जंक्शन येणारी वाहतूक. हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स येथून गुलाटी पेट्रोल पंप जंक्शनकडे येणारी वाहतूक.

COMMENTS