Homeताज्या बातम्यादेश

वाढवण बंदर प्रकल्पाचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन

सुमारे 76 हजार कोटी रूपयांचा प्रकल्प

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी वाढवण बंदराचे भूमिपूजन करतील. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे  76,000 कोटी रुपये आहे.  जागतिक दर्

नागपुरात सीएनजी 10 रुपयांनी स्वस्त
सोनागव सोसायटीत आमदार शशिकांत शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पॅनेलचा धुव्वा
परराज्यातील कामगारांची नाव इथंल्या मतदार यादीत लावने म्हणजे आपल्या मातीशी बेईमानी होय- आ.धनंजय मुंडे

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी वाढवण बंदराचे भूमिपूजन करतील. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे  76,000 कोटी रुपये आहे.  जागतिक दर्जाचे सागरी प्रवेशद्वार स्थापन करणे हे यामागचे उद्दिष्ट असून डीप ड्राफ्ट मुळे  मोठ्या कंटेनर जहाजांना तसेच अति-मोठ्या मालवाहू जहाजांना या बंदरांवर थांबा घेता येईल, त्यामुळे देशाच्या व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. यासोबतच पंतप्रधान मोदी सकाळी  सुमारे 11 वाजता पंतप्रधान मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 ला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास पंतप्रधान पालघर मधील सिडको मैदानावर विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ असलेले वाढवण बंदर, भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक असेल आणि आंतरराष्ट्रीय नौवहन  मार्गांना थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल,वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी करेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज अशा या बंदरात डीप बर्थ, कार्यक्षम कार्गो हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली असतील. या बंदरामुळे रोजगाराच्या संधीत लक्षणीय वाढ होईल, स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि प्रदेशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला मदत होईल  अशी अपेक्षा आहे. वाढवण बंदर प्रकल्पामध्ये शाश्‍वत विकास पद्धतींचा समावेश करण्यात आला असून  पर्यावरणीय प्रभाव कमी करणे आणि कठोर पर्यावरणीय मानकांचे पालन करण्यावर भर देण्यात आला आहे. हे बंदर कार्यान्वित झाल्यानंतर, भारताची सागरी कनेक्टिव्हिटी वाढेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत होईल. पंतप्रधान सुमारे 1,560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील ज्याचा उद्देश देशभरातील या क्षेत्राच्या पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढवणे हा आहे.  या उपक्रमांमुळे मत्स्य व्यवसाय क्षेत्रात पाच लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. या दौर्‍यात पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 360 कोटी रुपये खर्चाच्या नॅशनल रोल आउट ऑफ व्हेसल कम्युनिकेशन अँड सपोर्ट सिस्टीमचा म्हणजेच जहाजांच्या दरम्यान संपर्क आणि मदत यंत्रणा उभारण्याचा प्रारंभ करण्यात येईल. या प्रकल्पाअंतर्गत देशातील 13 किनारपट्टीवरील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्यात कार्यरत यांत्रिकी तसेच मोटरबसवलेल्या जहाजांवर टप्प्याटप्प्याने 1 लाख ट्रान्सपाँडर बसवण्यात येणार आहेत. व्हेसल कम्युनिकेशन अँड सपोर्ट सिस्टीम ही इस्रोद्वारे विकसित स्वदेशी तंत्रज्ञान प्रणाली असून मच्छिमारांना समुद्रात असताना दोन्ही बाजूंनी परस्परांशी संपर्क स्थापित करण्यात मदत करेल तसेच बचाव कार्यात मदत करून आपल्या मच्छिमारांची सुरक्षितता देखील सुनिश्‍चित करेल. याप्रसंगी, पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार्‍या इतर उपक्रमांमध्ये मासेमारी बंदरे आणि एकात्मिक क्वापार्क्सचे विकसन तसेच रिसर्क्युलेटरी क्वाकल्चर सिस्टीम आणि बायोफ्लॉक यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांचा स्वीकार यांचा समावेश आहे. हे प्रकल्प देशातील विविध राज्यांमध्ये राबवण्यात येणार असून माशांचे उत्पादन वाढवणे, मासेमारी-पश्‍चात व्यवस्थापन सुधारणे तसेच मत्स्य क्षेत्रात सहभागी असलेल्या लाखो लोकांसाठी शाश्‍वत उपजीविका निर्माण करणे या कार्यांसाठी निर्णायक ठरणार्‍या पायाभूत सुविधा तसेच उच्च दर्जाची सामग्री पुरवतील. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी मासेमारी बंदरे, मासे ठेवण्याची केंद्रे यांचा विकास, अद्यायावतीकरण आणि आधुनिकीकरण तसेच मासळी बाजारांचे बांधकाम यांसह महत्त्वाच्या मत्स्यव्यवसाय संबंधी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी देखील करण्यात येईल.

पंतप्रधान मुंबईला देखील देणार भेट – मुंबई भेटीदरम्यान पंतप्रधान ग्लोबल फिनटेक फेस्ट (जीएफएफ) 2024 च्या विशेष सत्राला संबोधित करतील. पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्व्हर्जन्स यांनी संयुक्तपणे या जीएफएफचे आयोजन केले आहे. देशभरातील तसेच जगातील अनेक देशांतून आलेले विविध धोरणकर्ते, नियामक, जेष्ठ बँकिंग तज्ञ, उद्योग क्षेत्रातील अगणी तसेच शिक्षण तज्ज्ञ असे सुमारे 800 वक्ते या परिषदेतील 350 हून अधिक सत्रांना संबोधित करतील. या चर्चेद्वारे फिनटेकविषयक परिदृष्यातील आधुनिक नवोन्मेषांचे देखील दर्शन घडेल. जीएफएफ 2024 मध्ये उद्योगविषयक सखोल जाण आणि सखोल माहिती देणार्‍या विचारवंतांचे 20 हून अधिक अहवाल आणि श्‍वेतपत्रिका सादर होणार आहेत.

COMMENTS