मुंबई प्रतिनिधी - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीव मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे. मुंबई पोलिसच्या ट्रॅफिक

मुंबई प्रतिनिधी – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीव मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे. मुंबई पोलिसच्या ट्रॅफिक कंट्रोल मोबाईल क्रमांकावर हा धमकीचा मेसेज आला. यावेळी कंट्रोल नंबरवर अनेक ऑडिओ क्लिपसही आल्या आहेत. त्यापैकी एका क्लिपमध्ये मोदींना ठार मारण्याचा दावा केला आहे. “अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे गुंड देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करणार आहेत” आणि देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं या ऑडीओ क्लिपमध्ये म्हटलं आहे. या मेसेजमुळे एकच खळबळ उडाली. याबद्दल तातडीने वाहतूक शाखेनं वरिष्ठ पोलिसांना याबद्दल माहिती दिली. वरळी पोलीस स्टेशनमध्ये याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली असून मेसेज कुणी पाठवला, याचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे.
COMMENTS