पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी : नाना पटोले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी : नाना पटोले

‘त्या’ वक्तव्याविरोधात काँगे्रसचे राज्यभर आंदोलन

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील काँगे्रसने देशभर कोरोना पसरवल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यात उमटले

कायदेशीर मार्गाने आरक्षण द्यावे लागेल
श्रद्धाची हत्या केल्याचा पश्‍चाताप नाही पॉलिग्राफ चाचणीमध्ये आफताबचे धक्कादायक वक्तव्य
आ.क्षीरसागरांच्या एकनिष्ठेला पक्षाकडून दाद !

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्रातील काँगे्रसने देशभर कोरोना पसरवल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यात उमटले. याविरोधात काँगे्रसने आक्रमक पवित्रा घेतला असून, बुधवारी राज्यात जोरदार आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद मोदी जोपर्यंत महाराष्ट्राची माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची घोषणा काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
मुंबईमध्ये मंत्रालयासमोर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी माफी मागितल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नसल्याचंही पटोले यांनी सांगितले आहे. तसेच राज्यभरातल्या भाजपा कार्यालयासमोर काँग्रेस आंदोलन करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले. यावेळी माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्र हे देशात कोरोना वाढवणारे राज्य आहे. ज्या राज्याने इथल्या जनतेने मदत करण्याचे काम केले, त्या जनतेचा अवमान करण्याचा अधिकार मोदींना नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान जनता आता सहन करणार नाही. जोवर मोदी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील. प्रत्येक जिल्ह्यात भाजपा कार्यालयासमोर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. राज्यातल्या भाजपा नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही पटोले यांनी केली आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातले नेते, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील असतील. ते मोदींच्या वक्तव्याचं समर्थन करत असतील तर त्यांनी जाहीर करावं. ते महाराष्ट्र द्रोही ठरतील. त्यामुळे महाराष्ट्र भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करावी. यावेळी जमावाने पंतप्रधान मोदी यांच्या निषेधार्थ तसंच राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या. मोदी ते तानाशाही नही चलेगी, मोदी तेरी हिटलरशाही नही चलेगी, राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, झुठा है झुठा है नरेंद्र मोदी झुठा है, अशी घोषणाबाजी यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.

COMMENTS