Homeताज्या बातम्यादेश

नोबेल पारितोषिकाचे पंतप्रधान मोदी दावेदार – असल तोजे

युद्ध रोखण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः तब्बल वर्षभरापासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून, हे युद्ध अजूनही संपण्याची चिन्हे नाहीत. मात्र युद्ध आजमितीस तरी योग

आदिवासी समाजासाठी प्रत्येक गावात स्मशानभूमी मिळावी
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षा उत्साहात
गुजरात विद्यापीठात पुन्हा नमाज पठणावरून राडा

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः तब्बल वर्षभरापासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून, हे युद्ध अजूनही संपण्याची चिन्हे नाहीत. मात्र युद्ध आजमितीस तरी योग्य नसल्याची भूमिका भारताच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली होती. तसेच रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना युद्ध रोखण्यापासून समजावून सांगितले होते. या पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाचे नोबेल पारितोषिक समितीने कौतुक केले आहे. भारतीय पंतप्रधानांचे कौतुक करताना नोबेल समितीचे नेते असल तोजे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी नोबेल शांतता पुरस्काराचे प्रबळ दावेदार असू शकतात.
नोबेल समितीचे डेप्युटी लीडर असल तोजे म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना युद्ध रोखण्याबाबत समजावून सांगितले ते कौतुकास्पद आहे. त्यांनी कोणतीही धमकी न देता आण्विक युद्धाच्या परिणामांबद्दल कठोर संदेश दिला, आंतरराष्ट्रीय राजकारणात आपल्याला अशा नेत्यांची गरज आहे. तोजे म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे अत्यंत विश्‍वासू नेते आहेत, जे शांतता प्रस्थापित करू शकतात. ते म्हणाले की, पीएम मोदी हे जगातील मोठ्या राजकारण्यांपैकी एक आहेत आणि ते शांततेसाठी मोठे योगदान देत आहेत. ’हे युद्धाचे युग नाही’ असे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना सांगितल्याबद्दल असल तोजे यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. नोबेल समितीच्या नेत्याने भारताला विकसित देश बनवण्यात पंतप्रधान मोदींच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक केले. भारत हा शांततेचा वारसा आहे असे सांगून असल तोजे म्हणाले की, भारत महासत्ता बनणार आहे. याशिवाय ते म्हणाले की पीएम मोदी हे युद्ध थांबवणारे सर्वात विश्‍वासू नेते आहेत आणि ते जगात नक्कीच शांतता प्रस्थापित करू शकतात. तोजे म्हणाले की, मला आनंद आहे की मोदी केवळ भारताला पुढे नेण्याचे काम करत नाहीयेत, तर जगातील शांततेसाठी महत्त्वाच्या असलेल्या मुद्द्यांवरही ते काम करत आहेत. त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे. हे निश्‍चित आहे की, भारत महासत्ता बनेल. असल तोजे हे नॉर्वेजियन नोबेल समितीचे डेप्युटी लीडर आहेत. ते परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक आहेत आणि 2009 पासून ते नोबेल शांतता पुरस्कार समितीमध्ये सामील होईपर्यंत नॉर्वेजियन नोबेल संस्थेत संशोधन संचालक होते. तोजे हे नॉर्वेजियन परराष्ट्र धोरणाच्या चर्चेत नियमित योगदान देत असतात. ते डॅगन्स नॅरिंगस्लिव्ह, मिनर्व्हामधील नियमित स्तंभलेखक आहेत.

COMMENTS