Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान मोदी आणि शरद पवार उद्या एकाच मंचावर

विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पुणे/प्रतिनधीः  पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवारी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाह

पुण्यात शिवशाही बसचा ब्रेक फेल झाला
पारनेर नगर पंचायतीवर येणार राष्ट्रवादीची सत्ता
अ‍ॅपलचे थ्रेट अलर्ट

पुणे/प्रतिनधीः  पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मंगळवारी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार असल्यामुळे उद्या पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एकाच मंचावर बघायला मिळणार आहे. पंतप्रधान मोदी या पुणे दौर्‍यात त्यांची विविध कार्येही नियोजित करण्यात आली आहेत. यामध्ये मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणे, विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीचाही समावेश आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. तिथे पूजा केल्यानंतर सकाळी 11.45 वाजता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर, 12.45 मिनिटांनी मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मेट्रो 1 च्या दोन मार्गिकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. 2016 मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणे जोडतील. देशभरातील नागरिकांना आधुनिक आणि पर्यावरणस्नेही गतिमान शहरी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला साकार करण्याच्या दिशेने हे लोकार्पण एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

COMMENTS