Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपुरात पंतप्रधानांनी साधला नव मतदारांशी ऑनलाईन संवाद

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील इस्लामपूर व आष्टा या दोन ठिकाणी नमो नव मतदार संमेलन झाले.

कायचिकित्सा विषयात एलआरपी आयुर्वेद मेडिकल कॉलेजचा मंगेश तपकीर राज्यात प्रथम
बोंडारवाडी धरणासाठी आवश्यक निधी देणार : ना. अजित पवार यांची माहिती
कराड विकास सोसायटीत काँग्रेस-राष्ट्रवादीत होणार टक्कर; संचालक मंडळात कोण मंत्री की मंत्री पुत्र?

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील इस्लामपूर व आष्टा या दोन ठिकाणी नमो नव मतदार संमेलन झाले. इस्लामपूर येथील प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलामध्ये झालेल्या संमेलनात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मतदार युवा पिढीशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांची प्रमुख उपस्थित होती.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, तुमचे एक मत भारतातील विकासाच्या गती देईल. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवेल. युवा पिढी हि देशाची खरी ताकद व विचार आहे. तुम्ही प्रथमच येणार्‍या निवडणुकीत मतदान करणार आहात, देशाला सक्षम नेतृत्व देण्यासाठी आपण आपले मत योग्य नेतृत्वाला द्याल, गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले प्रश्‍न मोदी सरकारने सोडविले आहेत. मोदी सरकार पूर्ण बहुमत असलेले सरकार असल्याने कलम 370, वन रॅक, वन पेन्शन, नारी शक्ती वंदन कायदा, तिहेरी तलाक कायदा, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू आदी निर्णय घेता आले. मोदी सरकार रात्रं-दिवस काम करत आहे. भाजपा सरकारने देशातील तरुणांना दिशा मिळावी नवनवीन तंत्रज्ञान अवगत व्हावे. म्हणून विविध योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत.
यावेळी भाजपाचे वाळवा तालुकाध्यक्ष निवास पाटील, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह नव मतदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा व युवती मोठ्या संख्येत उपस्थित होत्या.

COMMENTS