Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुधाला प्रतिलिटर 40 रूपये भाव द्या

शेतकर्‍यांनी दूध ओतून आंदोलन करत केली मागणी

छ.संभाजीनगर ः दूधाचा प्रतिलिटर खर्च 35 रूपये असून देखील दूधाला भाव मिळत नाही. त्यातच पाणी टंचाई असून, शेतकर्‍यांना दररोज हजोरो लिटर पाणी विकत घेऊ

 रेल्वे ची वायर तुटल्यामुळे नंदीग्राम एक्स्प्रेस बंद
संजय राऊत यांना मिळालेला जामीन म्हणजे सत्याचा आणि निष्ठेचा विजय
निवासी डॉक्टरांची राज्यव्यापी संपाची हाक

छ.संभाजीनगर ः दूधाचा प्रतिलिटर खर्च 35 रूपये असून देखील दूधाला भाव मिळत नाही. त्यातच पाणी टंचाई असून, शेतकर्‍यांना दररोज हजोरो लिटर पाणी विकत घेऊन जनावरे जगवावे लागत आहे. अशा पाणीटंचाईच्या परिस्थितीत दुधाला भाव मिळत नाही, त्यामुळे दुधाला 40 रूपये भाव देण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या 10 किमी अंतरावरील आडगाव येथील शेतकर्‍यांनी केली आहे. दूधाचा उत्पादन खर्च 35 रूपयांवर गेला असून, त्या तुलनेत भाव उणे 10 रूपये म्हणजे 25 रूपये प्रतिलिटर मिळत असल्याने दुध विक्री व्यवसाय संकटात सापडला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकर्‍यांनी गुरूवारी अंगावर दुध ओतून अनोखे आंदोलन केले. तसेच दुधाला प्रतिलिटर 40 रूपये भाव सरकारने द्यावा. अन्यथा आता दूध सांडले पुढे रक्त सांडू आंदोलन करू, असा निर्वाणीचा इशारा दिला आहे. दूध आंदोलक विश्‍वंबर हाके म्हणाले की, बिलसरी पाण्याचा उत्पादन खर्च प्रतिलिटर 2 रूपये आहे. त्या पाण्याची बाजारात किंमत 20 ते 25 रूपये आहे. दुध उत्पादनाचा खर्च 36 रूपये प्रतिलिटर आहे. दुधाला भाव 25 मिळतोय. म्हणजेच शेती पुरक दुग्ध व्यवसाय 10 रूपये प्रतिलिटप्रमाणे तोट्याने करावा लागत आहे. यामुळे दुध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून दुभते जनावरे कशी सांभाळावीत? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

COMMENTS