पोलिस असल्याचे भासवून वृद्ध महिलेला लुटले .

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस असल्याचे भासवून वृद्ध महिलेला लुटले .

64 वर्षीय महिलेची दोन इसमांनी केली फसवणूक

अहमदनगर (संगमनेर) : तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा (Ambikhalsa) फाटा परीसरात दोन अज्ञात इसमांनी पोलिस असल्याच

साई मल्टीस्टेटने व्यावसायिकांना आधार देण्याचे काम केले ः खा. लोखंडे
Akole : कळसुबाई शिखरावर देवी भक्तांचा जनसाग | LokNews24
वकीलांचा आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार

अहमदनगर (संगमनेर) : तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा (Ambikhalsa) फाटा परीसरात दोन अज्ञात इसमांनी पोलिस असल्याचे भासवून घरकाम तसेच आठवडे बाजार करणाऱ्या 64 वर्षीय वृद्ध महिलेस लुटल्याची घटना घडली आहे . संगमनेर तालुक्यातील घारगाव (Ghargaon) येथे 64 वर्षीय वृद्ध महिला ताराबाई किसन पांडे(Tarabai Kisan Pandey)

या घारगाव स्थानकाडून आंबी खालसा येथे आपल्या राहत्या घरी जाण्यासाठी असताना दोन अज्ञात इसम  दुचाकीवर येऊन आम्ही पोलिस (Police) आहोत, सध्या चोरांचा जास्त सुळसुळाट झाला आहे . तुम्ही तुमच्या गळ्यातील दागीने काढून द्या मी पुडीत बांधून देतो असे सांगितले . आजींनी गळ्यातील दागिने काढून त्यांच्याकडे दिले. तर त्या महाठगांनी पुडी त्या वृद्ध महिलेस देत धूम ठोकली आहे . पुडी उचकून पाहिली असता त्यात वाळू भरलेली दिसली . हे पाहून या वृद्ध महीलेच्या पायाखालची जमीनच सरकली आणि वृद्ध महिलेने एकच टाहो फोडला.या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करत आहे.

COMMENTS