Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबर रोजी रायगडावर

The President, Shri Ram Nath Kovind कोल्हापूर / प्रतिनिधी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबर रोजी दुर्गराज रायगडला भेट देऊन छत्रपती शिवाजी महार

इस्लामपूर शहरातील ट्रॉफीक सिग्नलचे काम सुरु; अनेक दशकाचा प्रलंबीत प्रश्‍न मार्गी : निशिकांत भोसले-पाटील
कोल्हापूरमध्ये ट्रॅपचे आणखी दोन प्रकार उघड; दोन व्यापार्‍यांना 36 लाखाला लुटले
पाटण तालुक्यातील जनतेचे जीवन उध्दवस्त होणार? पाटण तालुका नक्षलग्रस्त घोषित करा.

कोल्हापूर / प्रतिनिधी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबर रोजी दुर्गराज रायगडला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहेत. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या निमंत्रणानुसार ते गडावर येत आहेत. दरम्यान, राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग रायगडावर सन 1985 मध्ये आले होते. त्यानंतर 35 वर्षांनंतर राष्ट्रपती गडाला भेट देत असल्याने शिवप्रेमींत कार्यक्रमाची उत्सुकता आहे. संभाजीराजे यांनी दिल्ली येथे आयोजित शिवजयंती सोहळ्यात राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते.
ते निमंत्रण स्वीकारून राष्ट्रपती कोविंद रायगडला भेट देतील. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी रायगड जिल्हा प्रशासन व रायगड विकास प्राधिकरणातर्फे सुरु झाली आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या सहकार्याने कार्यक्रम होईल. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी सन 1980 मध्ये शिवछत्रपतींच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त रायगडावर आल्या होत्या. त्यांनी सिंहासनाच्या जागेवर मेघडंबरी उभारण्याची सूचना केली होती. मेघडंबरीचे काम पूर्ण झाल्यानंतर सन 1985 मध्ये राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते मेघडंबरीचे अनावरण झाले. या घटनेला 35 वर्षे पुर्ण झाली आहेत. आता राष्ट्रपती कोविंद गडावर येणार आहेत.

COMMENTS