Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नोंदणी व मुद्रांक विभागाच्या शिपाई पदासाठी डॉक्टर-इंजिनिअरसह मॅनेंजमेंटच्या उमेदवारांची पसंती

सातारा / प्रतिनिधी : गेल्या महिन्यात मुद्रांक विभागाच्या शिपाई पदासाठी जाहीरात प्रसिध्द होताच बेरोजगार अभियंत्यांबरोबरच काही नवख्या डॉक्टर, फार

प्रतापगड कारखान्यात संस्थापक सहकार पॅनेलची एकहाती सत्ता : सर्व 21 जागांवर विजय
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक प्रवासातील सातारा
जयप्रभा स्टुडिओ प्रकरणी आंदोलकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

सातारा / प्रतिनिधी : गेल्या महिन्यात मुद्रांक विभागाच्या शिपाई पदासाठी जाहीरात प्रसिध्द होताच बेरोजगार अभियंत्यांबरोबरच काही नवख्या डॉक्टर, फार्मासिस्ट, कला-वाजिन्य-विज्ञान शाखेच्या पदवीधर, पदव्युत्तर, व्यवसाय मॅनेंजमेंटचे शिक्षण घेतलेल्यांनी शिपाई पदासाठी अर्ज केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यापूर्वी पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी नवख्या अभियंत्यासह फार्मासिस्ट शारिरीक चाचणीसाठी मैदानात उतरले होते. मलाईदार विभाग असल्याने शिपाई पदाच्या अवघ्या 284 जागांसाठी सुमारे 1 लाख 20 हजार सुशिक्षित बेरोजगार तरूणांनी अर्ज केला आहे.
सन 1995 पासून आजपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदासाठी खुली भरती झाली नव्हती. त्यामुळे 22 एप्रिल 2025 रोजी शिपाई पदासाठी प्रसिध्द झालेल्या जाहीरातीनुसार अर्ज भरणारांनी नेट कॅफेवर गर्दी केली होती. स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या लाखोच्या घरात आहे. त्यातच शालांत परिक्षा होताच ही जाहिरात प्रसिध्द झाल्याने सर्व सुशिक्षित बेरोजगारांनी या परिक्षेकडे खूपच गांभिर्याने पाहिल्याचे जाणवले. मुळात नोंदणी व मुद्रांक विभाग म्हणजे मलाईदार विभाग म्हणून ओळख आहे. त्यामुळे अशा विभागात काम करण्यास सर्वांमध्ये मोठा उत्साह पहावयास मिळाला. या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरताना काही नवखे डॉक्टर, अभियंते, फार्मासिस्ट तसेच मॅनेंजमेंटच्या पदवीधर तसेच पदव्यत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांनीही अर्ज भरले आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी आपण घेतलेली शैक्षणिक माहिती काही प्रमाणात लपवली आहे. यामुळे या परिक्षेचा निकाल जाहिर झाल्यानंतर भूतो न भविष्यते असे मेरीट लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात या विभागाला चांगले उच्च शिक्षित शिपाई मिळणार की इतरत्र उच्च पदावर निवड झाल्यानंतर ही पदे पुन्हा रिक्त होवून मागचे दिवस पुढे येणार का? अशी परिस्थिती आली तर नोंदणी व मुद्रांक विभाग यावर काय निर्णय घेणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. एकच विद्यार्थी एकाच वेळी 10 ते 15 परिक्षा देतो, त्यातील उच्च व मलाईदार पदावर हजार होतो. तसेच हाताला काम नाही म्हणून मिळेल ते पदरात पाडून घेत चांगली संधी मिळताच संधीचे सोने करत असल्याचे पहावयास मिळत आहे. एकदा का पद भरले की पुन्हा पदासाठी मान्यता घेण्यापासून ते जाहीरात प्रसिध्दी, परिक्षा व निवड प्रक्रिया आदी टप्प्यांना पुन्हा सामोरे जावे लागते. हे सर्व कावायत प्रकार होत असताना संबंधित विभागाला पुन्हा खाजगी यंत्रणेवर अवलंबून रहावे लागते.

COMMENTS