देवळाली प्रवरा ः कोल्हापूर जिल्ह्यात ऐन दिवाळीत ऊसदरासाठी आंदोलनाचा भडका उडाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी स
देवळाली प्रवरा ः कोल्हापूर जिल्ह्यात ऐन दिवाळीत ऊसदरासाठी आंदोलनाचा भडका उडाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने तीन हजार भाव जाहिर केला असून अन्य सहकारी व खाजगी कारखान्यांनी माञ अद्याप भाव जाहिर केले नसू अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी संघटना ऊसदर आंदोलना बाबत अद्यापही झोपेत असून ऊसदर बाबत शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी आपली भुमिका जाहिर न केल्याने शेतकर्यांमध्ये संभ्रमअवस्था असुन शेतकरी संघटनांनी आपली भूमिका जाहिर न केल्यास शेतकर्यांनाच रस्त्यावर उतरावे लागेल अशी अवस्था नगर जिल्ह्यात निर्माण झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या हंगामातील उसाला प्रतिटन 400 रुपये अधिक द्यावेत आणि चालू गळीत हंगामासाठी प्रतिटन 3 हजार 500 रुपये पेक्षा जास्त द्यावा. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. राजू शेट्टी यांना राजकीय आव्हान मिळू लागले असल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाली असल्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. आंदोलनाची वाढती तीव्रता पाहता साखर कारखाने तसेच परिसरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात मात्र डॉ. पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने गेल्या व पुढील गळीत हंगामासाठी तीन हजार रुपये भाव जाहिर केला आहे. जिल्ह्यातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगामाचे ऊसदर जाहिर न करताच गळीत हंगाम सुरु केला आहे.जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामातील ऊस दरा बाबत शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. 2600 ते 2700 च्या भावावर शेतकर्यांना समाधान मानावे लागले आहे. या वर्षीच्या गळीत हंगामात माञ प्रवरा कारखाना वगळता कोणी हि भाव जाहिर केला नाही. जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याने भाव जाहिर न करता ऊस तोड सुरु केली आहे. पहिल्या साखर पोत्याचे पुजन करण्यात झाले आहे. माञ ऊस दरा बाबत कोणीही तोंड उघडले नाही. दरवर्षी ऊस भाव जाहिर केल्या शिवाय ऊसाला कोयता लावू देणार नाही.असे शेतकरी संघटना आक्रमक आंदोलन करीत होती.साखर कारखाने ऊस तोड बंद राहिल या भीतीने भाव जाहिर करीत होते. या वर्षी मात्र साखर कारखान्या बरोबरच शेतकरी संघटना ही शांत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी संघटना ऊस दरा बाबत गप्प का? असा सवाल शेतकरी करीत आहेत.
COMMENTS