Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रथमेश टेके याने वारीच्या नावलौकिकत घातली भर ः प्रकाश गोर्डे

कोपरगाव : अलीकडच्या काळात उच्च पदावर जाण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा उत्तम मार्ग आहे. मात्र त्यासाठी अथक परिश्रमाची गरज आहे. या परिश्रमात जो सातत्य

कोपर्डीतील युवकाचे अपघाती निधन
ऑक्सिजन संपल्याने डॉक्टर हतबल ; खासगी रुग्णालये व्हेंटिलेटरवर
अरे बापरे…मनपा अधिकार्‍यांनी विकला मनपाचाच भूख़ंड? ; सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा दावा, आयुक्तांकडून चौकशीची ग्वाही

कोपरगाव : अलीकडच्या काळात उच्च पदावर जाण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा उत्तम मार्ग आहे. मात्र त्यासाठी अथक परिश्रमाची गरज आहे. या परिश्रमात जो सातत्य ठेवून यशस्वी होतो. तोच राज्य शासनाच्या मोठ्या पदांवर विराजमान होतो. त्याचप्रमाणे प्रथमेशने अभ्यासरुपी परिश्रम करून राज्य शासनाच्या पुरवठा निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. हे निश्‍चितच वारीच्या नावलौकिकात भर घालण्याची कामगिरीच असल्याचे गौरवोद्गार कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश गोर्डे यांनी काढले.
       कोपरगाव तालुक्यातील वारी येथील प्रथमेश सुभाषराव टेके याची नुकतीच स्पर्धा परीक्षेतून पुरवठा निरीक्षक या पदावर नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल वारी येथे रविवारी (दि.23) त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवव्याख्याते डॉ. सर्जेराव टेके म्हणाले, परिसरातील गावांनी शासकीय अधिकारी दिले. परंतु,राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, व्यावसायिक दृष्ट्या परिपूर्ण असलेल्या वारी गावातून आजवर एकही प्रशासकीय अधिकारी का निर्माण होऊ नये याची खंत होती. मात्र; ही खंत प्रथमेश टेके यांने भरून काढत वारीतून पहिला प्रशासकीय अधिकारी होण्याचा मान पटकावला आहे. याचा निश्‍चितच आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी नरेंद्र ललवानी, दौलत वाईकर, सरपंच सतीश कानडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीशराव कानडे, माजी ग्रा. सदस्य मधुकरराव टेके, गोरख टेके, विजय निळे, बाबाजी भक्त परिवाराचे भाऊसाहेब टेके, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र ललवाणी, सोमया उद्योग समूहाचे सेवानिवृत्त अधिकारी मदन काबरा, ग्रामपंचायत सदस्य अनिल गोरे, दौलत वाईकर, रोहित टेके, योगेश झाल्टे, पोस्टमास्टर संजय कवाडे, शिवव्याख्याते डॉ. सर्जेराव टेके, कौटुंबिक सदस्य विजय ठाणगे, संजय टेके, राजेंद्र टेके, भूषण ठाणगे, संजय देशमुख, बापू बहिरमल, संतोष भाटे, राजू ठाकूर, राजेंद्र मुरार, संतोष तवरेज, उमाकांत टेके, गजानन टेके, मधुकर टेके, गंगामाई टेके, विशाल टेके पाटील, विजय ठाकरे, विलास गोंडे, गणेश भाटी, दीपक झाल्टे, भाऊसाहेब मोरे, मधुकर सोनवणे, रवींद्र टेके, सुरज टेके, स्वप्निल टेके, रामकृष्ण टेके, जय ठाकरे, राजवर्धन टेके, जयवर्धन टेके यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रोहित टेके यांनी तर गोरख टेके यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राहुल दादा मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व राहुल दादा मित्र मंडळ, भरतवाडी च्या सर्व सन्माननीय स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

गेल्या चार-पाच वर्षापासून सातत्याने हा प्रयत्न सुरू ठेवला आहे. दोन वेळा पीएसआय पद हे थोड्यक्यात निसटून गेले. मात्र; मी थांबलो नाही. तर प्रयत्न सुरूच ठेवले. यातून या पदावर यश मिळाले. यश मिळालं तरी एक खंत आहे. यावेळी राहुल दादा नाही. तो असता तर आणखी आनंद झाला असता.  या पुढील काळातही ’क्लासवन’ साठी माझे प्रयत्न सुरूच राहणार आहे. आणि मला खात्री आहे. मी त्यातही यशस्वी होणारच आहे. ग्रामस्थांनी केलेल्या सत्काराबद्दल मी ॠणात इच्छितो.
प्रथमेश टेके, पुरवठा निरीक्षक

COMMENTS