Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रतीक पाटील हे राजारामबापू साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी …?

सहकारातून राजकीय एंट्री; तालुक्यात वाढता जनसंपर्कइस्लामपूर / प्रतिनिधी : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे राजकीय वारसदार प्रतीक पाटील असल

आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क
नगरविकास आराखड्या विरोधात मेढ्यात शेतकर्‍यांचे आंदोलन; प्रास्तावित आराखडयाची होळी
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी मुलावर कृष्णा हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार

सहकारातून राजकीय एंट्री; तालुक्यात वाढता जनसंपर्क
इस्लामपूर / प्रतिनिधी : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे राजकीय वारसदार प्रतीक पाटील असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहेत. इस्लामपूर मतदार संघात त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे. प्रतीक पाटील हे त्यांची राजकीय कारकीर्द मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमाणेच साखर कारखान्याचे अध्यक्षपदाने करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
सन 1984 मध्ये राजारामबापूंचे निधन झाले. त्यांच्या पश्‍चात वाळवा तालुका तसेच वाळवा तालुका साखर कारखान्याची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्‍न उपस्थित झाला होता. प्रा. शामराव पाटील, दिलीपतात्या पाटील, शंकर पाटील, भीमराव पाटील-कणेगावकर या मंडळींनी परदेशात शिकायला गेलेले जयंत पाटील यांना तालुक्यातील राजकारणात त्यांची आवश्यकता का आहे हे पटवून देण्यात यशस्वी झाले. त्यांच्या या प्रयनत्नाने बापूंची उणीव भरून काढण्यासाठी जयंत पाटील यांना वाळवा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तेंव्हापासून खर्‍या अर्थाने मंत्री जयंत पाटील यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.
सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मंत्री जयंत पाटील यांच्यावर पक्षाबरोबर राज्याची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांना इस्लामपूर मतदारसंघात फिरण्यासाठी कमी वेळ मिळत होता. मात्र, मतदारसंघात मतदारांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी प्रतीक पाटील यांच्यावर सोपविण्यात आली होती. या काळात त्यांनी युवकांचे संघटन करून राष्ट्रवादी प्रचाराची सूत्रे सांभाळली होती. बापूंच्या पासून आजपर्यंत जयंत पाटील यांच्या सोबत असणार्‍या सर्वच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी प्रतीक पाटील यांनी या निमित्ताने घेतल्या. त्या काळातील राजकीय अनुभव, प्रसंग जाणून घेतले.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर प्रतीक पाटील इस्लामपूर मतदार संघात जास्त सक्रिय झाले आहेत. कोरोनाच्या काळात भागातील, तालुक्यातील गावांमध्ये आरोग्य सुविधा तसेच लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रतीक यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. प्रतीक पाटील यांची साखर कारखान्याच्या माध्यमातून राजकीय कारकीर्द सुरु करण्याची तयारी सुरु झाली आहे. त्याच बरोबर इस्लामपूर नगरपालिकेची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आल्याचे समजते आहे. त्यासाठी पालिकेतील नगरसेवक खंडेराव जाधव, शहाजीबापू पाटील, संजय कोरे, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे हे नेते त्यांच्या सोबत दिसत आहेत. एकंदरीत प्रतीक पाटील यांची राजकीय कारकीर्द मंत्री जयंत पाटील यांच्याप्रमाणे कारखान्याच्या अध्यक्ष पदापासून सुरू होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

COMMENTS