Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रशांत दामले यांच्या मातोश्री विजया दामले यांचे निधन

मुंबई प्रतिनिधी - मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना मातृशोक झाला आहे. प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले यांचे रात

डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थेकडून ग्राहकांना मोबाईल बँकिंग सेवा
भोंगे उतरत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
आई वडिलांनी मुलीला फेकून दिले नाल्यात

मुंबई प्रतिनिधी – मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना मातृशोक झाला आहे. प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले यांचे रात्री वयाच्या 93व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. प्रशांत दामले यांच्या आंबोली अंधेरी येथील राहत्या घरामध्ये त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे. या बातमीमुळे मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशांत दामले हे नाटकाच्या दौऱ्यानिमित्त पुण्यामध्ये होते. आज साडे तीन वाजण्याच्या सुमारास आंबोली स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार  येणार आहेत. चित्रपट विश्वातील अनेकांनी प्रशांत दामले यांच्या आई विजया दामले यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहली आहे.

COMMENTS