सोलापूर प्रतिनिधी - कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने दणदणीत यश मिळवले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, व काँग्रेस आमदार

सोलापूर प्रतिनिधी – कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने दणदणीत यश मिळवले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, व काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचा त्यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले. आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे कर्नाटकातील दावणगिरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी होती. या मतदारसंघातील आठ पैकी सहा विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.
सोलापूर काँग्रेस कमिटी कडून काल ढोल ताशाच्या गजरात फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला होता. आज माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांची सोलापुरात आगमन झाले. शहर काँग्रेस कमिटी कडून सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांना हार घालून कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले गेले, त्याच बरोबर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
COMMENTS