Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘प्राण’तर्फे रियल्‍टर्स डेनिमित्त ७ डिसेंबरला कार्यक्रम 

नाशिक नेक्‍स्‍ट' विषयावर विविध क्षेत्रातील मान्यवर घडविणार समूहचर्चा

नाशिक- प्रोफेशनल रियल्‍टर्स असोसिएशन ऑफ नाशिक (प्राण) या संस्‍थेच्‍या वतीने येत्‍या ७ डिसेंबरला (७/१२) रियल्‍टर्स डे साजरा केला जातो. त्यानुसार य

’आपली खरेदी आपल्या गावात’ उपक्रमातून आर्थिक उलाढाल वाढणार ः पुष्पाताई काळे
आरक्षणावरून संभ्रम करू नका ः मुख्यमंत्री शिंदे
आरोपांच्या मालिकेद्वारे भाजपची सत्तेसाठी धडपड ; रोहित पवार यांची टीका

नाशिक– प्रोफेशनल रियल्‍टर्स असोसिएशन ऑफ नाशिक (प्राण) या संस्‍थेच्‍या वतीने येत्‍या ७ डिसेंबरला (७/१२) रियल्‍टर्स डे साजरा केला जातो. त्यानुसार येत्या ७ डिसेंबरला दुपारी ३ वाजेपासून कॉलेजरोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणातील  गुरुदक्षिणा सभागृहात कार्यक्रम आयोजित केला आहे. दीपक बिल्‍डर्स ॲण्ड डेव्‍हलपर्सच्‍या सहकार्याने असोसिएशनतर्फे ‘नाशिक नेक्‍स्‍ट’ या विषयावर यावेळी समूह चर्चेचे आयोजन केले आहे. या उपक्रमात सहभागी होऊन विविध क्षेत्रातील तज्‍ज्ञ त्‍यांच्‍या त्‍यांच्‍या क्षेत्रात नाशिकला भविष्यात उपलब्‍ध असलेल्‍या संधींबाबतची माहिती देतील.

येत्‍या ७ डिसेंबरला होणार्या या कार्यक्रमात नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, एनएमआरडीएचे आयुक्त सतिशकुमार खडके, एनएमआरडीएचे उपसंचालक दीपक वराडे उपस्थित राहणार आहेत. तर स्ट्रॅटेजीक बिझनेस सोल्युशन्स (इंडिया ) चे डॉ. संजय रूणवाल यांची विशेष उपस्थिती असेल.

समूह चर्चेमध्ये क्रेडाई चे माजी अध्यक्ष जीतूभाई ठक्कर, दिपक बिल्डर्स ॲंड डेव्हलोपर्स चे दिपक चंदे,नरेडको चे अध्यक्ष अभय तातेड, क्रेडाई मेट्रो नाशिकचे अध्यक्ष कृणाल पाटील, सुभद्रा इस्टेट चे निरंजनभाई शहा, औद्योगिक संघटना निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे,  ऑल इंडिया वाईन प्रोड्युसर्स असोसिएशनचे जगदीश होळकर, दी ॲव्‍हेन्‍यु बिल्डर्स अॅण्ड डेव्‍हलपर्सचे मुकूंद साबु, इस्‍पॅलियर स्‍कूलचे संचालक व शिक्षण तज्‍ज्ञ सचिन जोशी, सह्याद्री ॲग्रोचे प्रमुख विलास शिंदे, आणि विनजित टेक्‍नॉलॉजीज्‌चे सहसंस्‍थापक अभिजित जुनागडे हे मान्‍यवर सहभागी होणार आहेत. या उपक्रमासाठी दी ॲव्‍हेन्‍यु बिल्‍डर्स ॲण्ड डेव्‍हलपर्स, एचडीएफसी बँक, अर्बन साईट्स, नयनतारा प्रेसिडेंसी ,आउटडोर मार्केटिंग पार्टनर मेक एडवरटाइजिंग यांचे सहकार्य लाभते आहे. या कार्यक्रमास असोसिएशनच्‍या सदस्‍यांनी, रियल ईस्टेट क्षेत्राशी निगडीत असणारे तसेच रियल ईस्टेट गुंतवणूकदारांनी व नागरिकांनी उपस्‍थित राहावे, असे आवाहन प्राणचे अध्यक्ष विक्रांत आव्‍हाड, उपाध्यक्ष प्रदीप रणधीर, सचिव नितीन कोतकर, खजिनदार कैलाश कदम, सहसचिव राज तरलेजा, सल्‍लागार डी जे धामणे व राजेंद्र कोतकर आदि सदस्‍यांनी केले आहे. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य ,नितीन जांगडा ,श्रीरंग भदाणे ,अमित वाघ,जगदीश बंग,निलेश येवले,मनीष शाह,क्षितीज दंडगव्हाल,यश शाह, संजय दुसे,प्रकाश कटपाल,गिरीश विजन, रवी सुर्यवंशी परिश्रम घेत आहे. याआधीदेखील असोसिएशनतर्फे आपल्‍या सदस्‍यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. दरवर्षी रियल्‍टर्स डे ७/१२ रोजी मोठ्या उत्‍साहात साजरा केला जात असतो. व त्‍यास सदस्‍य, नाशिककरांचा चांगला प्रतिसादही मिळत असल्‍याने ‘प्राण’तर्फे सर्वांचे आभार मानले आहे.

लकी ड्रॉद्वारे बक्षिसे जिंकण्याची संधी- कार्यक्रमास उपस्थित नागरिकांमधून काही भयवंतांना बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये टीव्ही, लॅपटॉप, टॅब, स्मार्टफोन आदींचा समावेश आहे. कृपया कार्यक्रमाच्या नाव नोदंणी साठी प्राण संस्थेशी संपर्क करावा.

COMMENTS