हिंगोली प्रतिनिधी - काँग्रेस नेते राहुल गांधी यांची काल भारत जोडो यात्रेत काँगे्रसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रकाश सोनवणे यांनी भेट घेत,
हिंगोली प्रतिनिधी – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची काल भारत जोडो यात्रेत काँगे्रसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रकाश सोनवणे यांनी भेट घेत, बारा बलुतेदारांच्या प्रश्नांविषयी चर्चा केली. बारा बलुतेदार हा समाज दुर्लक्षित आणि वंचित असून, या समाजाला अजूनही आरक्षणाचे लाभ फारसे मिळालेले नाही.राज्यातील नेते, सत्ताधारी, विरोधकांची ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीत बोटचेपी धोरण दिसून येते. राज्याची ही भीषण अवस्था आपल्यासमोर आहे. खर्या उपेक्षित वंचित ओबीसीची अवस्था गेल्या 50 वर्षात बदलली नसल्याचे प्रकाश सोनवणे यांनी राहुल गांधीच्या लक्षात आणून दिले.
याविषयी माहिती देतांना प्रकाश सोनवणे म्हणाले की, हिंगोली जिल्ह्यात प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी माझी ओबीसी मधील बलुतेदार नेता व नाभिक समाज नेता म्हणून भेट घडउन आणली. प्रदेश काँग्रेसमधील प्रॉपर काँगे्रस लिडर अशी माझी ओळख या भेटी दरम्यान नानांनी करून दिली.2014 च्या दरम्यान बलुतेदार शिष्टमंडळास दिल्ली येथे भेटीअंती त्यांनी दिलेल्या आश्वासनांची व पुन्हा 2018 साली मला व्यक्तिगत दिलेल्या आश्वासनाची आठवण, मी त्यांना करून दिली. आजवर काँग्रेसने आमच्यासाठी काहीही केले नाही असे ठणकावून सांगितले असता त्यावर मुझे सारी बाते याद है ! वापस एक बार मिलेंगे असे आश्वासन दिल्याची माहिती सोनवणे यानी दिली.
COMMENTS