Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रज्वल ढाकणे यांना सामाजिक जाणिवेचा पुरस्काराने सन्मानित

कोपरगाव शहर ः अगदी कमी वयात योगामध्ये नावलौकिक प्राप्त केलेले कोपरगाव येथील युवायोग प्रशिक्षक प्रज्वल आदिनाथ ढाकणे यास नुकताच अहिल्यानगर येथील स्

नगर-मनमाड महामार्गावरील भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू | DAINIK LOKMANTHAN
स्व. वसंतराव झावरे पाटील कोव्हिड सेंटरमध्ये विश्वशांती लोककल्याण यज्ञाचे आयोजन | आपलं नगर | LokNews24
अबब ; अहमदनगर मध्ये म्युकरमायकोसिसचे एवढे रुग्ण! पहा LokNews24*

कोपरगाव शहर ः अगदी कमी वयात योगामध्ये नावलौकिक प्राप्त केलेले कोपरगाव येथील युवायोग प्रशिक्षक प्रज्वल आदिनाथ ढाकणे यास नुकताच अहिल्यानगर येथील स्नेहालय परिवाराच्या वतीने सन्मान योग सेवेचा सामाजिक जाणिवेचा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रज्वल ढाकणे यांने विविध ठिकाणी जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय योग स्पर्धेत सहभाग नोंदवत वेगळे सन्मान मिळवत कमी वयात नावलौकिक मिळविला असून राष्ट्रीय योगासना स्पर्धेत 2 रोप्य तर राज्यस्तरीय योगा स्पर्धेत 3 सुवर्णपदक तसेच युथ फेस्टिवल 2024 नाशिक येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर यांच्या समोर प्रज्वलने योगासने सादर केले आहे तर आजपर्यंत अनेक शाळा महाविद्यालयात मोफत योगा प्रशिक्षणाचे कार्यक्रम घेत अनेक विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले आहे या सर्व कार्याची दखल घेत अहिल्यानगर येथील स्नेहालय या संस्थेने प्रज्वल ढाकणे याचा अहिल्यानगर येथील स्नेहालय येथे नुकताच संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रकार भगवान रामपुरे यांच्या शुभहस्ते  गौरव करण्यात आला. याप्रसंगी स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रमोद कांबळे, विकास कांबळे, प्रणिता बोरा, बालाजी बल्लाळ, आदिसह अहिल्यानगर येथील शिल्पकार, चित्रकार, स्नेहालय येथील सर्व कर्मचारी, अधिकारी, विद्यार्थी मित्रपरिवार यासह योग प्रशिक्षक आदी प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 273 आठवड्यापासून अविरतपणे कोपरगाव शहरातून वाहणार्‍या पवित्र अशा गोदावरी नदी स्वछता मोहीम राबविणारे गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांचे चिरंजीव असून प्रज्वल देखील आपल्या वडिलांसोबत गोदावरी नदी स्वच्छतेत व सामाजिक कार्यात सहभागी होत असतो.प्रज्वल च्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

COMMENTS