Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माधुरी तिय्या यांना प्रहार जीवनगौरव व प्रहाररत्न पुरस्कार

शिर्डी ः दैनिक प्रहार परिवाराच्या वतीने शिर्डी व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्रहार जीवनगौरव व प्रहाररत्न पुरस्कार वितरण सोहळा थाटात

दुकानमालकाकडून ६ लाखांची फसवणूक : कर्जतमधील प्रकार ; गुन्हा दाखल
कोपरगावात पहाट पाडवा भक्ती गीतांचा कार्यक्रम उत्साहात
आमदार मोनिका राजळेंच्या दिवाळी फराळाला भाजपा नेते,पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राहिले उपस्थित

शिर्डी ः दैनिक प्रहार परिवाराच्या वतीने शिर्डी व परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्रहार जीवनगौरव व प्रहाररत्न पुरस्कार वितरण सोहळा थाटात पार पडला असून या सोहळ्यात राजकीय, सामाजिक, वैद्यकीय तसेच धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना व महिलांना त्यांच्या उत्तुंग सामाजिक कार्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते मकरंद अनासपुरे व श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्त्या, सामाजिक कार्यात सहभागी असणारे योगेश तिय्या व त्यांची पत्नी माधुरी तिय्या, शिर्डी हे कुटुंब नेहमी सामाजिक क्षेत्रात गरजवंतांना मदतीसाठी धावून जाणारे हे कुटुंब शिर्डी सह परिसरात परिचित असून आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन दैनिक प्रहार परिवाराच्या वतीने शिर्डीतील हॉटेल साई संगम येथे हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तिय्या कुटुंबांसह राहाता व शिर्डी परिसरातील अनेकाना प्रहार रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.तर तिय्या परिवाराला मिळालेल्या पुरस्काराबद्दल अनेक मित्र परिवाराने तिय्या यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS