Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रदीप कुरूलकर यांना 15 मे पर्यंत कोठडी

पुणे ःपाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणारे पुण्यातील डीआरडीओचे बडतर्फ संचालक प्रदीप कुरूलकर यांना 15 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. नावंदर

आंदोलनाचा इशारा देताच वीजपुरवठा सुरळीत
मराठी फलकांचा मुद्दा ऐरणीवर
म्हसवड-हिंगणी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी ठिय्या

पुणे ःपाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवणारे पुण्यातील डीआरडीओचे बडतर्फ संचालक प्रदीप कुरूलकर यांना 15 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. नावंदर यांच्या कोर्टात या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी (9 मे) पार पडली. या प्रकरणात वकिलांनी तपासाचा प्रगती अहवाल सादर केला आहे. गेल्या 3-4 दिवसात विविध साक्षीदार तपासण्यात आले आणि काही नवीन माहिती देखील समोर आली आहे. तपास अधिकार्‍यांना न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून काही रिकव्हर केलेला डेटा प्राप्त झाला आहे. म्हणजेच आरोपीच्या मोबाईलवरून काही डेटा डिलीट करण्यात आला होता. आरोपींवर केलेले आरोप गंभीर असल्याने सदर डेटा तपासणे आवश्यक असल्याचे न्यायाधीशांनी सांगितले.

COMMENTS