गेवराई । प्रतिनिधीबुधवारी गेवराई येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आनंद नगरी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात शा

गेवराई । प्रतिनिधी
बुधवारी गेवराई येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘आनंद नगरी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात शाळेचे प्रांगण लहान बाजारपेठेसारखे सजवले गेले आणि विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक भाग घेतला.
आनंद नगरीमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, उद्यमशीलता, आत्मविश्वास वाढतो तसेच भविष्यातील व्यवसायिक आणि सामाजिक कौशल्यांचा विकास होतो. कार्यक्रमाला गेवराई नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष भगवानराव घुंबार्डे, नगरसेवक प्रशांत राख, पत्रकार विनोद नरसाळे, होके, प्राचार्य आर. डी. पवार आणि मुख्याध्यापक डी. एम. चव्हाण यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले आणि अशा अनुभवांमुळे आत्मविश्वास व स्वावलंबन वाढते, तसेच व्यवसाय ज्ञान मिळते, असे मत व्यक्त केले. आनंद नगरीत विद्यार्थ्यांनी घरच्या घरी बनवलेले वडापाव, सोयाबीन रोस्ट, जिलेबी, भजी, भेळ, पोहे, उपमा इत्यादी खाद्यपदार्थ विक्रीसाठी आणले, तर शेतातून आणलेली मोसंबी, काकडी, हरभरा इत्यादी कृषी उत्पादने स्टॉलवर मांडली. प्रत्यक्ष विक्रीतून विद्यार्थ्यांनी पैशांचे नियोजन, नफा-तोटा, ग्राहकांशी संवाद, वेळेचे व्यवस्थापन आणि संघभावना यासारखे व्यवहारिक धडे घेतले. या उपक्रमात फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली, आणि आनंद नगरी यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी मोठे परिश्रम घेतले.

COMMENTS