Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘भातकुडगाव’ अंतर्गत वाड्यावस्त्यांवरील वीजपुरवठा खंडित; ‘रस्ता रोको’चा इशारा; दोन दिवसांत पुरवठा सुरू न झाल्यास आंदोलन

शेवगाव : तालुक्यातील भातकुडगाव सब स्टेशन अंतर्गत भातकुडगाव, हिंगणगाव, जोहरापूर, खामगाव आदी गावांतील वाड्यावस्त्यांवरील सिंगल फेज वीजपुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. सदर भागातील अनेक वाड्यावस्त्यांपर्यंत गावठाण वीजलाईन पोहोचलेली नसल्याने पूर्वी शेती फिडरवरून सिंगल फेज वीजपुरवठा करण्यात येत होता. मात्र, अचानक हा पुरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, वरिष्ठांच्या आदेशानुसार वीजपुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, शेवगाव तालुक्यात इतर ठिकाणी सिंगल फेज वीजपुरवठा सुरू असताना या काही गावांवर अन्यायकारक धोरण राबवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जर पुढील दोन दिवसांत वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला नाही, तर शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव ईसरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष संदीपराव बामदळे यांच्या नेतृत्वात शुक्रवार, दि. २० मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता शेवगाव-नेवासा मार्गावरील भातकुडगाव फाटा येथे ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, महावितरणचे अभियंता भामरे यांनी आजच वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रसंगी हिंगणगावचे सरपंच सतीश बापू पवार, आजिनाथ उगलमुगले, दत्तू मस्के, गोविंद पालवे, वैभव लांडे, पांडुरंग पारठे, अशोक देवढे, संजय पवार, कानीफनाथ धूमाळ, सचिन मेरड, महेश पवार आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील कविसंमेलन, हळदीकुंकू  उपक्रम प्रेरणादायी ः मुरकुटे
अखंड हरिनाम सप्ताहसाठी निघोज ग्रामस्थांचे अमूल्य योगदान ः जंगले महाराज शास्त्री
 मंदिरातून पावणेचार लाखाचे दागिने लांबवले

शेवगाव : तालुक्यातील भातकुडगाव सब स्टेशन अंतर्गत भातकुडगाव, हिंगणगाव, जोहरापूर, खामगाव आदी गावांतील वाड्यावस्त्यांवरील सिंगल फेज वीजपुरवठा गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सदर भागातील अनेक वाड्यावस्त्यांपर्यंत गावठाण वीजलाईन पोहोचलेली नसल्याने पूर्वी शेती फिडरवरून सिंगल फेज वीजपुरवठा करण्यात येत होता. मात्र, अचानक हा पुरवठा बंद करण्यात आल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे.

याबाबत स्थानिक नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, वरिष्ठांच्या आदेशानुसार वीजपुरवठा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, शेवगाव तालुक्यात इतर ठिकाणी सिंगल फेज वीजपुरवठा सुरू असताना या काही गावांवर अन्यायकारक धोरण राबवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

जर पुढील दोन दिवसांत वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला नाही, तर शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव ईसरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष संदीपराव बामदळे यांच्या नेतृत्वात शुक्रवार, दि. २० मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता शेवगाव-नेवासा मार्गावरील भातकुडगाव फाटा येथे ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, महावितरणचे अभियंता भामरे यांनी आजच वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे.

या प्रसंगी हिंगणगावचे सरपंच सतीश बापू पवार, आजिनाथ उगलमुगले, दत्तू मस्के, गोविंद पालवे, वैभव लांडे, पांडुरंग पारठे, अशोक देवढे, संजय पवार, कानीफनाथ धूमाळ, सचिन मेरड, महेश पवार आदी उपस्थित होते.

COMMENTS