Homeताज्या बातम्यादेश

पंतप्रधान मोदींच्या विरोधात पोस्टरबाजी, 6 ताब्यात

नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्टरबाजी करण्यात आलीय. याप्रकरणी पोलिसांनी 100

एकनाथ खडसेंच्या 5.73 कोटींच्या संपत्तीवर ईडीची टाच
कसबा-चिंचवड निकालाचा अन्वयार्थ !
अर्थखाते टिकेल की नाही सांगता येत नाही

नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्टरबाजी करण्यात आलीय. याप्रकरणी पोलिसांनी 100 हून अधिक एफआयआर नोंदवले असून 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दिल्लीचे राजकारण करणार्‍या एक पक्ष या पोस्टरबाजीत असल्याची माहिती पुढे आली.
दिल्ली शहराच्या विविध भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्टर्स लावण्यात आले आहेत. यात मोदी हटाओ देश बचाओ अशी आक्षेपार्ह शेरेबाजी करण्यात आली. पोस्टर बनवल्यावर त्या पोस्टरवर छापखान्याचा नंबर दिला जातो. मात्र या पोस्टरवर कोणताही नंबर दिलेला नाही. परंतु, या पोस्टरवर लिहीलेल्या मजकुराचे मॅटर आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांनी बुधवारी सकाळी ट्विट केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी 6 जणांना ताब्यात घेतले असून चौकशीत त्यांनी दिल्लीतील एका राजकीय पक्षाचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीत सध्या 100 ठिकाणी पोस्टर्स लागले आहेत. परंतु, राजकीय पक्षाने 5 हजार पोस्टर्स छापल्याची माहिती पुढे आली असून पोलिस त्यानुषंगाने तपास करीत आहेत.

COMMENTS