Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकप्रिय टीव्ही अभिनेता पवन सिंहचे 25 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई प्रतिनिधी - साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधुन एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. हिंदी आ

केज शहरातील नागरिकांनी महा राजस्व अभियानाचा लाभ घ्यावा- तहसीलदार
मिंधे गटातील लोक भाजप ने लिहुन दिलेली स्क्रिप्ट वाचुन बोलतात – संजय राऊत 
आमदार राजू कोरमोरे यांना धमकी

मुंबई प्रतिनिधी – साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधुन एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. हिंदी आणि तमिळ टीव्ही अभिनेता पवन सिंह याने वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. पवनला हृदयविकाराचा झटका आला होता. पवनचे 18 ऑगस्टला निधन झाले. पवन हा मुळचा कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात राहत होता. कर्नाटकचा असून तो कामानिमित्त कुटुंबासह मुंबईत राहत होता. पवनचा मृतदेह मुंबईहून त्याच्या मूळ गावी मांड्या येथे नेण्यात येणार आहे. तिथे त्याचे कुटुंबीय त्याच्यावर अंतिम संस्कार करतील. पवनच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. अद्याप हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्या मृत्यू झाला आहे की दुसरे काही कारण होते याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्याच्या चाहत्यांसह अनेक कलाकार आणि राजकीय मंडळींनी पवनच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ज्यात मंड्याचे आमदार एचटी मंजू, माजी आमदार केबी चंद्रशेखर, माजी मंत्री केसी नारायण गौडा, माजी आमदार बी प्रकाश, टीएपीसीएमएसचे अध्यक्ष बीएल देवराजू, काँग्रेस नेते बुकनाकेरे विजया रामेगौडा, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बी नागेंद्र कुमार, इतर अनेकांचा समावेश आहे.पवन हा मुळचा कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात राहत होता. कर्नाटकचा असून तो कामानिमित्त कुटुंबासह मुंबईत राहत होता. मीडिया रिपोर्टनुसार पवनचा मृतदेह मुंबईहून त्याच्या मूळ गावी मांड्या येथे नेण्यात येणार आहे. तिथे त्याचे कुटुंबीय त्याच्यावर अंतिम संस्कार करतील. पवनच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. अद्याप हृदयविकाराचा झटका आल्याने त्याच्या मृत्यू झाला आहे की दुसरे काही कारण होते याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

COMMENTS