छोट्या पडद्यावरील सोनी सबवरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'('Taarak Mehta Ka Ulta Chashma) गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन क
छोट्या पडद्यावरील सोनी सबवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा'(‘Taarak Mehta Ka Ulta Chashma) गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जुन्या कलाकारांनी मालिकेला रामराम ठोकला असला तरी, त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. यामध्ये पोपटलाल(Popatlal) ची भूमिका साकारणारा अभिनेता श्याम पाठक(Shyam Pathak) ही प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहे. श्याम उर्फ पोपटलालने हॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात अनुपम खेरसोबत श्याम पाठक दिसत आहेत. व्हिडीओ पाहून सर्वच चाहते आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
COMMENTS