नवी दिल्ली/प्रतिनिधी ः केंद्र सरकारने नुकतच नवे संसद भवन उभारले असून, या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत
नवी दिल्ली/प्रतिनिधी ः केंद्र सरकारने नुकतच नवे संसद भवन उभारले असून, या संसद भवनाच्या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याऐवजी राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मू यांच्या हस्ते उद्धाटन करण्याची मागणी विरोधकांची असून, या विरोधी पक्षांतील नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, या 19 पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. एकूण 19 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ही माहिती दिली. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संसद भवनाचे उद्घाटन केले जावे, अशी मागणी यापूर्वीच केलेली आहे. बहिष्कार टाकणार्या पक्षामध्ये काँग्रेस, आम आदमी पार्टी (आप), तृणमूल काँग्रेस, द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), जनता दल-युनायटेड (जेडीयू), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) , समाजवादी पक्ष, उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, करेला काँग्रेस मणी, विदुथलाई चिरुथाईगल कच्छी, राष्ट्रीय लोक दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स आणि क्रांतिकारी समाजवादी पक्ष यासह इतर मारुमलार्ची द्रविड मुन्नेत्रग यांचा सहभाग आहे.
दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेत सांगितले की, ’60,000 श्रमयोगींनी विक्रमी वेळेत नवीन संसद भवनाचे बांधकाम पूर्ण केले आहे. त्यामुळे पंतप्रधान यावेळी सर्व श्रमयोगींचाही सन्मान करणार आहेत. अशा बाबतीत विरोधकांकडून राजकारण केले जाणार हे माहित आहे. पण आम्ही सर्वांना आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे अशी आमची इच्छा आहे. शहा म्हणाले की, नव्या संसदेत सेंगोल (राजदंड) ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचा अर्थ संपत्तीने संपन्न. ज्या दिवशी संसद राष्ट्राला समर्पित होईल, त्या दिवशी तामिळनाडूत आलेले विद्वान हे सेंगोल पंतप्रधानांना देतील. तो संसदेत मांडला जाईल. शहा म्हणाले की, सेंगोलला यापूर्वी अलाहाबादमध्ये ठेवण्यात आले होते.
ऐतिहासिक राजदंड ठेवणार संसदेत – केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन 28 मे रोजी होणार्या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाविषयी माहिती दिली. यावेळी ऐतिहासिक राजदंडाचे पुनर्जिवन करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक राजदंडाला सेंगोल असे म्हणतात, ज्याचा सर्वांत आधी वापर पंडित जवाहरलाल नेहरूंनी ऑगस्ट 1947 साली केला होता. या सेंगोलचे महत्त्व आणि इतिहासही अमित शाहांनी सांगितला. 28 मे रोजी नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या संसद भवनाच्या निर्मितीसाठी ज्या 60 हजार कामगारांनी योगदान दिलं आहे, त्यांचाही यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी सन्मान करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
एका आदिवासी राष्ट्रपती महिलेला डावलले ः राऊत नव्या संसद भवनाची काय गरज होती? आपली जुनी संसद आणखी 100 वर्षे टिकणार इतकी बळकट आहे. तरीही या सरकारने नवी संसद उभारली. तरीही राष्ट्रपतींना उद्घनापासून का डावलले आहे? नावाच्या पाट्या लावण्यासाठी नवी संसद उभारली आहे का? असा प्रश्न विचारत संजय राऊत यांनी म्हटले आहे. एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती केले असे वारंवार मोदी सांगत होते. मग राष्ट्रपती महिलेची आठवण संसदेचे उद्घाटन करताना का झाली नाही? 28 मे रोजी नव्या संसद भवनाचा जो सोहळा होणार आहे त्या सोहळ्यावर काँग्रेससह आमचा बहिष्कार आहे. एका आदिवासी राष्ट्रपती महिलेला डावलले आहे त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे असंही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
COMMENTS