Homeताज्या बातम्याशहरं

कराड पालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमिवर दबावाचे राजकारण सुरु

कराड / प्रतिनिधी : पालिकेच्या निवडणुकांचा मोसम बेभरवशाचा झाला असला तरी, राजकारणाचा मोसम मात्र, कराडात चांगलाच रंगात आला आहे. शहरात राजकीय हालचाली

दहशदवादाचे मुंबई कनेकशन
औंधची पोलीस वसाहत फळा-फुलांनी बहरणार ; पोलीस वसाहतीत 100 झाडांची लागवड
महाविकास आघाडी सरकार प्रत्येक गुन्ह्याचे समर्थन करते : आ. चंद्रकांत पाटील

कराड / प्रतिनिधी : पालिकेच्या निवडणुकांचा मोसम बेभरवशाचा झाला असला तरी, राजकारणाचा मोसम मात्र, कराडात चांगलाच रंगात आला आहे. शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांच्यासह भाजपही कामाला लागले आहे. गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सव ते पैगंबर जयंतीच्या निमित्ताने राजकीय नेत्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. प्रत्येक गट आपल्याकडे खेचण्यासाठी चढाओढ दिसत आहे. त्यातून वाद-प्रतिवाद तर शह-काटशहाचे राजकारणही दिसते. ठराविक मंडळांच्या डीजेकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते. अशा घटना राजकीय हेतूने व दबावाने होवू लागल्याने रंगत अधिक वाढत चालली होती.
येथील पालिकेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आ. चव्हाण, आ. पाटील व भाजप असे तीन प्रमुख गट आहेत. राजकारणावर परिणाम करणार्‍या स्थानिक नेत्यांच्या गटाला तितकेच महत्त्व असल्याचा इतिहास आहे. त्यात माजी उपाध्यक्ष जयवंत पाटील, माजी उपाध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांना महत्त्व प्राप्त होते. त्यापैकी यादव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाशी जवळीक साधली असली तरी अद्यापही जाहीर भूमिका केलेली नाही. शिवसेनेच्या शिंदे गटासोबत ते गेल्यास भाजपकडेही त्यांच्याशी युती करण्याचा पर्याय खुला राहील. त्यासाठी भाजपमध्ये डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर व शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्यात यासाठी एकमताची गरज आहे. माजी उपाध्यक्ष जयवंत पाटील यांच्याभोवती अनेकदा राजकारण फिरताना दिसून येते.

COMMENTS