Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 बेताल वक्तव्य करणाऱ्या राजकीय लोकांनी महापुरुषांचा इतिहास वाचावा – डॉ.शरद बाविस्कर

धुळे प्रतिनिधी- महाराष्ट्र सध्या सुरू असलेल्या महापुरुषांवरील बेताल वक्तव्या बाबत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) फ्रेंच साहित्याचे आणि तत्

Vasai : वसईत पोलिसांची दादागिरी दुकानात शिरुन दुकानदाराला मारहाण (Video)
शिवसेनेचे उदयसिंह राजपूत यांचा तो भन्नाट व्हिडिओ अखेर व्हायरल | LokNews24
कोतवाली पोलिसांवर सूराधारी तरुणाची दहशत

धुळे प्रतिनिधी– महाराष्ट्र सध्या सुरू असलेल्या महापुरुषांवरील बेताल वक्तव्या बाबत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) फ्रेंच साहित्याचे आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक प्राध्यापक डॉ. शरद बाविस्कर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून महापुरुषांच्या विषयी बोलणार यांनी त्यांचे विचारच कधी वाचले नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले यांच्यासह विविध महापुरुषांविषयी राजकीय पक्षातल्या लोकांकडून विविध बेताल वक्तव्य केली जात आहेत या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत भव्य निषेध मोर्चा देखील काढण्यात आला होता. महापुरुषां विषयी केल्या जाणाऱ्या बेताल वक्तव्यांचा राज्यातील विविध विचारवंतांनी देखील खरपूस समाचार घेतला आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथील फ्रेंड साहित्याचे आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक प्राध्यापक शरद बाविस्कर यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली असून महापुरुषांच्या विषयी भावनिक विचार करणे आणि त्यांचा मूळ इतिहास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या महापुरुषांच्या भावनांचा विचार न करणे म्हणजे त्यांचा मूळ इतिहास राजकीय पक्षातल्या लोकांनी वाचलेला नाही, महापुरुषांचा विषय हा अस्मितेचा असून शिक्षण, आरोग्य, महागाई, रोजगार या विषयांवरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी अशी बेताल वक्तव्य केली जात असल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक डॉ. शरद बाविस्कर यांनी व्यक्त केली

COMMENTS