पाथर्डी प्रतिनिधी- गेल्या चाळीस पन्नास वर्षांत काँग्रेस पक्षाने यांना काहीच दिले नसेल तर त्यांचे राजकीय आणि संस्थात्मक वैभव कोणामुळे हे समजण्याइत
पाथर्डी प्रतिनिधी- गेल्या चाळीस पन्नास वर्षांत काँग्रेस पक्षाने यांना काहीच दिले नसेल तर त्यांचे राजकीय आणि संस्थात्मक वैभव कोणामुळे हे समजण्याइतपत जनता अज्ञानी नाही.पक्षाने असं का केलंय यांच्या बाबतीत हा प्रश्न आपल्या सारख्या पदाधिकाऱ्यांना न पडता मतदारविरहित सर्वसामान्य जनतेला पडला आहे.यांना आमदारकी,मंत्रिपद,साखर कारखान्याला मदत,शिक्षण संस्थेला पाठींबा काँग्रेसने दिला नाही का?एवढं सगळं असून आज पक्षाशी असं वागता हे जनतेला रुचलेलं नाही.आईने मुलासाठी वाटेल तेवढं कष्ट करत मुलाला मोठं करायचं आणि त्याने तू माझ्यासाठी काय केलंस अस म्हणायचं ही वस्तुस्थिती आहे.
नाशिक पदवीधर विधानपरिषदेच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ एम.एम.निऱ्हाळी विद्यालयामध्ये बैठक घेण्यात आली त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे बोलत होते.यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवेसनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवेसनेचे तालुकाप्रमुख भगवानराव दराडे,काँग्रेसचे उपाध्यक्ष आनंद सानप,महिला तालुकाध्यक्ष सविता भापकर,माजी नगराध्यक्ष रत्नमाला उदमले,आरती निऱ्हाळी,माजी नगरसेवक बंडू बोरुडे,हुमायुन आतार,योगेश रासने आदी जण उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना ढाकणे यांनी म्हटले की,भारतीय जनता पक्ष मोठा राष्ट्रीय पक्ष आहे.पण पदवीधर निवडणूकीच्या पाठींबाबाबत निर्णय घ्यायला का घाबरतो हे काय मला मला समजत नाही.भारताच्या संस्कृतीचा विचार केला तर घमंडी लोकांना कुठेतरी खाली बसवावे लागते तेव्हा समाज जागेवर राहतो.पोटभर जेवलेल्या माणसाला उपाशी माणसाची भूक कळत नाही.तुम्हाला तुमच्या मोठेपणासाठी थाटामाटासाठी पद पाहिजे आम्हाला आमचे दुःख समजून घेत प्रश्न सोडवणारे नेतृत्व हवे आहे.अलीकडचे राजकारण पाहिले तर लोकांना गृहीत धरले जात असल्याचे लक्षात येते.आणि जर लोक त्यांना गृहीत धरले जात असताना शहाणपणाने वागले नाहीत.तर लोकांचे कल्याण कधी होत नाही हा लोकशाहीचा सिद्धांत आहे.
मला पाच पदवीधर निवडणुकीचा अनुभव आहे.नगर जिल्ह्यात शुभांगी पाटील यांच्या बाजूने सुप्त लाट आहे.तसेच मदत करण्याची मानसिकता मतदाराची असून ती मताद्वारे सिद्ध होईल.शुभांगी पाटील या कर्तबगार असून लढणाऱ्या आहेत.त्यांना तालुका मताधिक्य देत साथ देईल असे आश्वासन यावेळी ढाकणे यांनी दिले. यावेळी बाळासाहेब खेडकर,अजय पाठक यांनी भाषणे केली.तसेच शिक्षक सोसायटीचे सुरेश मिसाळ आणि दिगंबर ढाकणे यांनी संघटनेच्या वतीने शुभांगी पाटील यांचा सन्मान केला.
COMMENTS