अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा पोलिस दलातील कर्मचार्यांवर संक्रांत आल्याची स्थिती आहे. एका पोलिस कर्मचार्यास आठजणांनी बेदम मारहाण केली तर एका पोलिस कर्
अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्हा पोलिस दलातील कर्मचार्यांवर संक्रांत आल्याची स्थिती आहे. एका पोलिस कर्मचार्यास आठजणांनी बेदम मारहाण केली तर एका पोलिस कर्मचार्याला विष पाजून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला गेला. या दोन्ही प्रकरणांबाबत गुन्हे दाखल झाले असले तरी पोलिस दलात मात्र खळबळ उडाली आहे.
नगरच्या सोलापूर रस्त्यावरील चांदणी चौकात पोलिसाला मारहाण केल्याबद्दल आठ जणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. दुचाकीची धडक लागल्याच्या कारणातून पोलिस कर्मचार्याला 7 ते 8 जणांनी बेदम मारहाण करीत त्याच्याकडील 20 हजार रुपयांची रक्कम व 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल काढून घेतला. मुख्यालयात नेमणूक असलेले आदिनाथ दिनकर शिरसाठ (रा. आष्टी जि. बीड) असे लुटमार झालेल्या पोलिस कर्मचार्याचे नाव आहे. शिरसाठ हे दुचाकीवर चांदणी चौकातून जात असताना महालक्ष्मी मंदिराच्यासमोर दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणातून त्यांचा व जाधव यांचा वाद झाला. या वादात आठ जणांनी पोलिस कर्मचारी शिरसाठ यांना मारहाण केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी श्याम बाबासाहेब जाधव, रोहन राजु जाधव (दोघे रा. निंबोडी ता. नगर) व अनोळखी सहा जणांविरूध्द दरोड्याचा गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात दोघांना ताब्यात घेतले असून अन्य आरोपींचा शोध कोतवाली पोलिस घेत आहेत.
COMMENTS