Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूरमध्ये पोलीस उपनिरीक्षकाची गळफास लावून आत्महत्या

नागपूर प्रतिनिधी - नागपूरमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गोपाळ गोळे असं 34 वर्षीय मृतक पोलीस अधिका

सहायक लोको पायलटची आत्महत्या
 ‘everything will be ok’ स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या
बीड तालुक्यात तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

नागपूर प्रतिनिधी – नागपूरमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गोपाळ गोळे असं 34 वर्षीय मृतक पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. मानसिक तणावातून जीवन संपवलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस वसाहतीत ही घटना घडली आहे. गोपाल गोळे मागील तीन दिवसांपासून कार्यरत असलेल्या यशोधरानगर पोलीस ठाण्यात सुद्धा गेले नव्हते, अशी माहिती देखील समोर आली आहे. गोपाल गोळे यांच्या पत्नी मागील काही दिवसांपासून घरी नव्हत्या. मात्र मागील तीन दिवसांपासून गोळे यांचा फोन बंद असल्याने पत्नीला संशय आला. त्यानंतर गोळे यांच्या कुटुंबियांना याबाबत पोलीस स्टेशनमध्ये फोन करुन चौकशी केली. त्यावेळी ते पोलीस स्टेशनलाही आले नसल्याची माहिती मिळाली गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचारी गोळे यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी गोळे हे घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे पोलिसांना अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

COMMENTS