देवळाली प्रवरा/प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषां बद्दल बेताल वक्तव्य करणारेराज्यात भगत सिंग को
देवळाली प्रवरा/प्रतिनिधी – छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषां बद्दल बेताल वक्तव्य करणारेराज्यात भगत सिंग कोश्यारी व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे मंगळवारी दहन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांना पोलिस पथकाने धक्काबूक्की करून पुतळे जप्त केले. त्यामुळे काही काळ कार्यकर्ते व पोलिस पथकाची धावपळ होऊन दहशत निर्माण झाली होती.
आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी 13 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता राहुरी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्गावर बस स्थानक समोर जाहीर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विलास साळवे, आरपीआय महिला तालूकाध्यक्षा स्नेहल सांगळे, अनुसंगम शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व राज्यमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध व्यक्त केला. या प्रसंगी काही कार्यकर्तांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व राज्यमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिस पथकाने तात्काळ झडप घालून पुतळे ताब्यात घेऊन कार्यकर्त्यांना धक्काबूक्की करत गर्दीला पांगवीण्यात आले. त्यामुळे काही काळ बस स्थानक परिसरात कार्यकर्ते व पोलिस पथकाची धावपळ झाली होती. त्यानंतर आरपीआय संघटनेच्या वतीने शहरातून तीव्र घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला होता. महसूल व पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना सुरेंद्र थोरात यांनी कडाडून टिका करत या घटनेचा निषेध व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण बेताल व अवमानकारक वक्तव्याने दूषित होत आहे. जनतेच्या भावना भडकवल्या जात आहेत. राज्यात अशांतता निर्माण करणे पुरोगामी महाराष्ट्र राज्यातील जबाबदार पदावर असणार्या नेत्यांना व व्यक्तींना शोभत नाही. कुठलाही सारासार विचार न करता जातीय सलोखा गढूळ करण्याचे काम होत असल्याचे दिसत आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजां विषयी केलेले वक्तव्य व राज्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विषयी केलेले अवमानकारक वक्तव्य याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भगतसिंग कोश्यारी व चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागावी. तसेच येथून पुढे कोणीही अवमानकारक बेताल वक्तव्य केलेतर महाजन आंदोलन उभारून संबंधितांना याचा जाब विचारला जाईल. आणि पुढे होणार्या परिणामाची जबाबदारी प्रशासन व संबंधितांची राहील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी सुनील चांदणे, बबन साळवे, बाबुराव साळवे, सिद्धांत सगळगीळे, स्नेहल सांगळे, सुरेंद्र सांगळे, करण साळवे, रोहन शिंदे, मुक्तार कुरेशी, आदित्य साळवे, मयूर सूर्यवंशी, संतोष दाभाडे आदी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS