Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कत्तलीसाठी नेणार्‍या सहा जनावरांची पोलिसांनी केली सुटका

कत्तलीसाठी नेणार्‍या सहा जनावरांची पोलिसांनी केली सुटका

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : राहुरी तालूक्यातील पाथरे येथे टेम्पोमधून सहा जनावरे कत्तलीसाठी चालवलेली होती. आप्पासाहेब नाईकवाडे व त्यांच्या सहकार्‍य

*दैनिक लोकमंथन ; ऑक्सिजन मास्कसह आंदोलन, कोविड सेंटरची मागणी
१२ वी ची परीक्षा पास होण्यासाठी हजारोंनी पैसे देऊनही मदत नाही
मारहाणप्रकरणातील सर्व 14 आरोपींना तुरुंगवास

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी : राहुरी तालूक्यातील पाथरे येथे टेम्पोमधून सहा जनावरे कत्तलीसाठी चालवलेली होती. आप्पासाहेब नाईकवाडे व त्यांच्या सहकार्‍यांनी जनावरे व टेम्पो असा एकूण साडेतीन लाख रूपयांचा मुद्देमालासह दोघां जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडे, वय 35 वर्षे, धंदा पशु वैद्यकीय, रा. तांदुळनेर, ता. राहुरी. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, आप्पासाहेब नाईकवाडे हे दुपारी बारा वाजे दरम्यान राहुरी तालूक्यातील पाथरे खुर्द या गावात असतांना जनावरांचा टेम्पो नेवासाकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी आप्पासाहेब नाईकवाडे, गौरव नारायण निमसे, नवनाथ भिकचंद टेकाळे, श्रीधर एकनाथ जाधव व इतर लोक हे पाथरे खुर्द, ता. राहुरी येथे थांबले. तेव्हा दोन इसम हे अशोक लेलंड टेम्पो नंबर एम. एच. 16 सी. सी. 3966 ही गाडी घेवुन येताना दिसले. टेंपोचा पाठलाग करुन पाहिले असता गाडीमध्ये सहा गोवंश जातीचे जनावरे त्यापैकी एक गाय व पाच देशी गोर्‍हे हे टेम्पो मध्ये त्यांचे हालहाल होतील असे दाटीवाटीने भरुन ते जखमी आवस्थेत त्यांची वाहतुक करीत असतांना मिळुन आले. नाईकवाडे यांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिस त्या ठिकाणी गेले. त्यांनी दोन लाख रूपये किंमतीचा टेम्पो व दिड लाख रूपये किंमतीची सहा जनावरे असा एकूण 3 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघां जणांना ताब्यात घेतले. आप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात वसीम गनी बागवान, वय 34 वर्षे व शोएब अलीम खाटीक, वय 22 वर्षे, दोघे रा. नाईकवाडी, ता. नेवासा. या दोघांवर महाराष्ट्र पशू संरक्षण अधिनियम कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहे.

COMMENTS