अमरावतीत पोलीस भरती प्रक्रिया ; शहरात ४१ तर, ग्रामीणमध्ये १९७ पदे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमरावतीत पोलीस भरती प्रक्रिया ; शहरात ४१ तर, ग्रामीणमध्ये १९७ पदे

अमरावती प्रतिनिधी - अमरावती शहर व ग्रामीण पोलीस दलात शिपाई व चालक शिपाई म्हणून जागा पटकावण्यासाठी आरंभलेली बहुप्रतिक्षित पोलीस भरती प्रक्रिया आज प

वाशी एपीएमसीत आंब्याची विक्रमी आवक
राज्यात बैलगाडी शर्यत सुरु होणारच : सुनील केदार
महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प : मुख्यमंत्री फडणवीस

अमरावती प्रतिनिधी – अमरावती शहर व ग्रामीण पोलीस दलात शिपाई व चालक शिपाई म्हणून जागा पटकावण्यासाठी आरंभलेली बहुप्रतिक्षित पोलीस भरती प्रक्रिया आज पासून सुरू झाली आहे.अमरावती  ग्रामीण पोलीस दलातील १९७ आणि शहरातील ४१ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे. त्यासाठी १५ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. शारीरिक चाचणीनंतर पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे. सकाळी सहा वाजता पासून येथील पोलीस मुख्यालयस्थित कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे,शहर पोलीस आयुक्तालयातील ४१ पदांसाठी २२४९ तरुण-तरुणींनी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये अनेक उच्चशिक्षित तरुणांचाही समावेश आहे. पोलीस भरतीमध्ये शिपाईपदाच्या २० जागांसाठी १३९० तर चालकांच्या २१ जागांसाठी ८५९ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर, अमरावती ग्रामीण पोलीस दलातही १९७ पदांसाठी देखील सोमवारपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यासाठी १३ हजारांवरून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

COMMENTS