Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहात्यात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा

तिर्रट खेळणारे 15 आरोपीं ताब्यात. 7 लाखांचा मुद्येमाल जप्त

राहाता /प्रतिनिधी ः राहाता येथील आंबेडकर नगर परिसरात शनिवारी,दि.19ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान पोलिस उपधिक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने

त्या’ अकरा पोलिस कर्मचार्‍यांचे निलंबन मागे l पहा LokNews24
अकोले रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी माजी प्राचार्य सातपुते
नगरच्या सनफार्मा कंपनीत आग लागून कामगाराचा मृत्यू | DAINIK LOKMNTHAN

राहाता /प्रतिनिधी ः राहाता येथील आंबेडकर नगर परिसरात शनिवारी,दि.19ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान पोलिस उपधिक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकत जुगार अड्डयावर 15 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असलेला 7 लाखांचा मुद्येमाल ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली.या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुप्त बातमीदारामार्फत राहाता येथिल आंबेडकर नगर येथे पत्र्याच्या मोकळ्या शेडखाली काही इसम तिर्रट नावाचा जुगार खेळत आहेत. अशी खात्रीशीर माहिती पोलिस उपाधिक्षक मिटके यांना मिळाल्याने त्यांनी पोलिस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी पोलिस पथकाने जाऊन छापा टाकला .तेथे त्यांना आरोपी दिलीप बाबुराव निकाळे (वय 40वर्ष रा.आंबेडकर नगर राहाता ), राहुल विजय कोपरे (वय 29 रा. आंबेडकर नगर ता.राहाता), नामदेव बाबुराव बिरे (वय 44रा. साकुरी ता.राहाता), हरिभाऊ निवृत्ती घोडेकर (वय 66 रा. एकरूखे ता. राहाता),महेश सोमनाथ पालांडे (वय 25रा.आंबेडकर नगर ता.राहाता), दत्तू जालिंदर थोरात (वय 34 रा. अण्णाभाऊ साठे नगर ता. राहाता), मनोज सुनील आहेर (वय 23 रा. राजवाडा ता. राहाता), राजू चिमाजी गायकवाड (वय 28 रा. साकुरी ता.राहता) आकाश अरुण शिरसाठ (वय 34 रा.आंबेडकर नगर ता.राहाता), प्रमोद शिवाजी पवार (वय 35 रा.शिर्डी ता.राहाता), बंडू पुंडलिक आहिरे (वय 55 रा.शिर्डी ,ता. राहाता), राजेंद्र आगस्तीन वाघमारे (वय 50 रा. पिंपळस ता. राहाता),संजय प्रल्हाद घोडके (वय 39 रा.16 चारी ता.राहाता),अश्फाक सिकंदर शेख (वय 58 रा.अस्तगाव ता.राहाता) पेत्रस सगन त्रिभुवन (वय 65 रा.अस्तगाव ता.राहाता) यांचे ताब्यातून 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून सर्व आरोपी विरुध्द राहाता पोलीस स्टेशन येथे पो.कॉ शाम सोपानराव जाधव यांचे फिर्यादिवरून मुंबई जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई पोलिस अधिक्षक, राकेश ओला, अपर पोलिस अधिक्षक.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिस उपधिक्षक संदीप मिटके पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी,पो.हे.कॉ इरफान शेख,पो.हे.कॉ आप्पासाहेब थोरमिसे,पो.ना अशोक शिंदे,पो.ना कृष्णा कुर्‍हे,पो कॉ शाम जाधव, पो.कॉ दिनेश कांबळे आदींनी केली आहे.

COMMENTS